नांदेडात शेवटचा लॉकडाउन म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी केली तीन दिवसांची वाढ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 19 July 2020

नांदेडात शेवटचा लॉकडाउन म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी केली तीन दिवसांची वाढ


२४ रोजी एक दिवस व्यापार सुरू,परत दोन दिवस बंद राहणार

नांदेड दि.१९ (विशेष प्रतिनिधी)  जिल्ह्यातील असंख्य नागरिक कोरोना महामारी भयावह स्थितीमुळे त्रस्त आहेत,मूळ भीती ही जाहिरातीतून दाखविली गेली,तर नेहमी नेहमी लॉकडाउन करून उपयोग काय?
एकीकडे म्हणायचं आता आपल्याला कोरोना सोबत जगायचं आणि दुसरीकडे लॉकडाउन करायचा जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?

ज्यांच हातावर पोट आहे अश्यांनी खळगी कशी भरावी,त्यांच्यापैकी काहींना online नोंद नाही म्हणून स्वस्त धान्य दुकानदार धान्य देत नाहीत,online या विषयाच महत्व कळले असते तर ते मजुरी करत बसले नसते,त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल,याचा विचार प्रशासनाने केलाय का?

आपल्या जिल्हा पुरवठा विभागातील काही अधिकारी यांचे स्वस्त धान्य दुकानदारांसमवेत धागेदोरे बांधलेले आहेत,हे यापूर्वी झालेल्या मोठ्या कारवाईत उघडकीस आले होते,काही अधिकारीही फरार आहेत,असो तसेच अद्यापही धागेदोरे नसतील हे कशावरून,जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्यांसाठी आर्थिक तरतूद काही केली आहे का?

रिक्षा वाल्यांना मागील 3 महिन्यांपासून कामच नाही तर त्यांनी हप्ते कसे भरायचे,लोहार काम करणारे पाल ठोकून राहतात त्यांनी संसार चालवून जीवन कसे जगायचे,शेतकरी बांधव खत,बी-बियाणे बोगस लागले असल्याने त्रस्त असे असंख्य नागरिक हे कामाविना व पैस्याअभावी त्रस्त आहेत,नुसते लॉकडाउन करून उपयोग नाहीच याविषयी लागणाऱ्या विषयांची सक्षम तरतूद असेल तरच लॉकडाउन चा उपयोग अन्यथा लोकांच्या वर्तमान व भविष्याच्या आयुष्याशी खेळ होतोय म्हणावा लागेल...!


No comments:

Post a Comment

Pages