भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहास मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या सोबत मनसेच्या शिष्टमंडळाची झाली चर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 10 July 2020

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहास मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भेट भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांच्या सोबत मनसेच्या शिष्टमंडळाची झाली चर्चा


मुंबई, : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  राजगृह या निवासस्थानी संध्याकाळी काही अज्ञातांकडून  हल्ला करण्यात आला होता. या बाबतची पाहणी करण्यासाठी
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर त्याच प्रमाणे जनहित कक्ष आणि विधी विभागाच्या काही वकीलाच्या शिष्टमंडळाने आज राजगृहास भेट देऊन पाहणी करण्यात आली. त्यावेळी तिथे उपस्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत सविस्तर चर्चा देखील करण्यात आली.

त्याचप्रमाणे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करत  मनसे जनहित कक्ष आणि विधी विभागाच्या वकील शिष्टमंडळाने त्वरित माटुंगा पोलिस ठाणे येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या सोबत चर्चा करून गुन्हेगाराना त्वरित पकडून  अत्यंत कडक कारवाई करण्याचे तसेच "राजगृहास" या पूढे २४ तास संरक्षण देण्याची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages