स्टेट बँक ऑफ इंडिया कडून निराळा तांडा हे गाव दत्तक नसल्याचे सांगून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ;शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 17 July 2020

स्टेट बँक ऑफ इंडिया कडून निराळा तांडा हे गाव दत्तक नसल्याचे सांगून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ;शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा


उमरी (बा)- किनवट तालुक्यातील निराळा तांडा हे गाव सारखणी पासून ९ किमी अंतरावर व उमरी बाजार पासून ७ किमी आणि मांडवी पासुन 14 किमी अंतरावर येत असून निराळा तांड्यातील काही शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया सारखणी आणि मांडवी शाखेतुन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे आणि गाव दत्तक  नसल्याचे सांगून महाराष्ट्र ग्रामीण बँक उमरी येथे पाठविण्यात येत आहे. सदर दोन्ही बँकेत निराळा तांड्यातील शेतकरी हा गेल्या 15 ते 20 वर्षांपासून पीक कर्ज उचलत आहे, बँकेच्या कर्मचारी वर्गांना शेतकऱ्यांनी कारण विचारले तेंव्हा सांगत आहे की, मा. जिल्हाधिकारी साहेबानी सगळ्या बँकांना आदेश दिला आहे की,दत्तक नसलेल्या गावांना पीक कर्ज देऊ नका आणि त्यांच गाव ज्या बँकेला दत्तक असेल त्यांना तिथे त्यांना पाठवा. यामुळे निराळा तांडा येथील काही शेतकरी हतबल झाले आहे. 
गावातील शेतकरी हे निराळा तांडा, निराळा, दगडवझरा आणि दहेली शिवारात येतात. काही शेतकऱ्यांनी बँकेने सांगितलेल्या कागदपत्रे सुध्दा काढलेली आहे आणि काहींनी सदर बँकेत कागदपत्रे सादर पण केली आहे, तरी बँकेच्या शाखा व्यवस्थापक साहेबानी पीक कर्ज देण्यास पुर्णपणे नकार दिलेला आहे. एकतर शेतीचे अर्धे काम पूर्ण झाली आहे त्यात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज असताना बँका मार्फत शेतकऱ्याची होत असलेली मानसिक पिळवणूक वेळीच थांबवून निराळा तांडा येथील शेतकऱ्यांना वेळीच कर्ज वाटप न केल्यास १ ऑगस्ट २०२० रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सारखनी येथे समस्त गावकऱ्या समवेत अमरण उपोषण करण्याचा इशारा निराळा तांडा येथील श्री.आशिष केवलसिंग नाईक (राठोड) यांच्या स्वाक्षरीत खालील निवेदक श्री.आकाश नारायण राठोड, संदेश प्रदीप राठोड, अजय नारायण पवार, सूरज धरमसिंग आडे,संजय रामसिंग राठोड,रणजित आडे , मनोज विश्वनाथ जाधव,प्रविण विश्वनाथ राठोड,संदीप प्रेमसिंग राठोड,निलेश अंबरसिंग राठोड,राहुल बाबुसिंग चव्हाण,अमोल बळीराम जाधव इत्यादी तरुणांनी निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

No comments:

Post a Comment

Pages