नांदेड : मागील २० वर्षांपासून प्रत्येक वर्षात येणा-या १ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस मित्र, सहकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करीत आले आहेत.आपले सर्वांचे प्रेम माझ्याआयुष्याची ऊर्जाशक्ती आहे.
या वर्षी कोरोणा सारख्या विषाणुने आपल्या देशात थैमान घातले आहे.मनुष्य जातीच्या जिवीत्वावर मोठे भयानक संकट आले आहे.अशा भयानक आणि गंभीर परिस्थिती मध्ये वाढ दिवस साजरा करण्यात कोणताही आनंद नाही.करिता या वर्षी आपला वाढ दिवस कार्यकर्त्यांनी साजरा करू नये, असे कळकळीने व नम्र आवाहन "प्रजासत्ताक पक्ष, महाराष्ट्र", या पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेश दादा गायकवाड यांनी नुकतेच केले आहे.
१ ऑगस्ट रोजी कुणीही आपल्या घरी हारतुरे घेऊन येऊ नये, अशी विनंती ही त्यांनी केली आहे.एक ऑगस्ट रोजी आपण स्वतः स्वागत स्विकारण्यास सामोरे येणारे नाही आहोत,केवळ मोबाईल वर ऊपलब्ध राहू, असेही त्यांनी सांगितले आहे.या राष्ट्रीय आपत्तीत संकटात सापडलेल्या बांधवाच्या मदतीसाठी "प्रजासत्ताक युवक आघाडी" च्या वतिने रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.रक्तदान करू ईच्छीणा-या ईच्छुकांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणात द्यावा, असे आवाहनही सुरेशदादा गायकवाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment