आज वाढदिवस त्यानिमित्ताने अभिष्टचिंतन ...
स्वप्निल उर्फ बंटी इंगळे पाटील..... जेमतेम पंचवीसीतला तरुण .... बघायला...दिसायला तसा सर्वसामान्य .... पण विद्यार्थ्यांसाठी सातत्याने धडपड ....आणि अंगीभूत असलेली चळवळ...त्यादृष्टीने सततची वाटचाल... या त्याच्या जमेच्या बाजू ....
तसे पाहिलं तर हा एक लढवय्या विद्यार्थी नेता असेल यावर पटकन विश्वास बसत नाही. टिपीकल उच्चमध्यमवर्गीय तरुणच वाटतो तो. अर्थात तो आहे विद्यार्थीच . त्यानं ‘मेकेनिकल इंजिनिअरींगचे ’ शिक्षण नुकतच पुर्ण केलय आणि पि.जी. करतोय..... गेली कित्येक वर्ष तो नांदेडातील विद्यार्थ्यांच्या चळवळीचा श्वास बनलाय तो त्याच्यातील असलेल्या धडपड्या स्वभावामुळे म्हणून. गेली कित्येक वर्षे ! चळवळीत काम करतांना सर्वांनाच एक प्रश्न सातत्याने पडतो तो म्हणजे या माणसाकडे नेतृत्व कुणाचं आहे ? तर सर्वच क्षेत्रातल्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे वेड हे काय गौडबंगाल आहे ? कारण हे जर एखाद्याने त्याला समोरून स्पष्टपणे विचारल तर तो अगदी सहज म्हणतो की मला व माझ्यामते आयुष्य हे असंच असतं असं म्हणता येईल.
आजवर त्यानं आपल्या स्टाईलनं अनेक आंदोलनं केली आहेत ; मात्र फक्त आक्रमक राहून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. याची पक्की जाणीव त्याला आहे. त्याच वागणं, बोलणं सुसंस्कृत !
सगळं व्यक्तिमत्त्वच एकदम सुसंस्कृत ! याचा उपयोग त्याला होतो. कुठं ? तर संवादाचा पूल बांधण्यासाठी. विद्यार्थी व विद्यापीठ. या दोघांत यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी. हे सगळं त्याला मुत्सद्देगिरीनं करावं लागतं. विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता करावं लागतं. विद्यापीठाच्या विश्वासही सांभाळावा लागतो. ही तारेवरची कसरत. ती तो अनेक वर्षे करतोच आहे. यापुढेही करतच राहील अशा उमलत्या विद्यार्थी चळवळीतल्या नेतृत्वाला मानाचा सलाम ..
आणि वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा ...
-मारोती सवंडकर , दै. सकाळ , नांदेड
No comments:
Post a Comment