मुंबई दि :30
विद्यार्थ्यांसाठी मन की बात बोलणारे माननीय प्रधानमंत्री मोदी आज गप्प का आहेत असा आर्त सवाल विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या प्रहरी केला.
पदवी व पदव्युत्तर परीक्षांची युजीसी ने लादलेली सक्ती दूर करून परीक्षा ऐच्छिक घ्याव्या व एटिकेटी च्या ही मुलांना पास करावे या साठी मंजिरी धुरी यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात बोलताना अत्यन्त दुःखी होत्या. , मोदी यांनी दहावी बारावीच्या मुलांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक करून धुरी पुढे म्हणाल्या की मोदींना विद्यार्थ्यानबद्दल दाखवलेली आस्था खोटी आहे की काय अशी शंका आता येउ लागली आहे.
दुसऱ्या दिवसाच्या पाहिलया सत्रात मंजिरी धुरी यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू झाले आहे. विद्यार्थी भारती महाराष्ट्र राज्य अध्यक्षा पूजा मुधाने व चिरंजीवी संघटनेच्या राज्यध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी देखील साखळी उपोषण करत मंजिरी ताईंच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे. उपोषणाला पाठिंबा देत प्रमुख उपस्थिती मराठी भारती कार्याध्यक्षा विजेता भोनकर यांनि आजच्या उपोषणाची सुरुवात करत केंद्राच्या व युजीसीच्या निष्ठुर भूमिकेचा निषेध करत मंजिरी ताईंच्या धाडसाचे कौतुक केले.
काल उपोषणाच्या पहिल्या दिवशी शिवसेनेचे प्रवक्ते मा. राहुल लोंढे व मनवीसे चे भिवंडी उपाध्यक्ष परेश चौधरी यांनी उपोषण स्थळी पोहचून या लढ्याला पाठिंबा दिला.
त्याचबरोबर आज पासून विद्यार्थी भारती चे सर्व कार्यकर्ते संध्याकाळी 4 वाजता आपापल्या दारातुन , खिडकीतून , बाल्कनीतुन मोदींजींच्या नावाने परीक्षा रद्द करा , मोदीजी जागे व्हा, विद्यार्थी त्रस्त है युजीसी मस्त है। अश्या घोषणा देत बोंबा मारणार आहेत. ह्या आंदोलनासाठी धुरी यांनी संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांना आव्हान करत "सरकारला जर विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळायला लाज वाटत नसेल आणि आपण ह्या बोंबा मारायला लाजत असू तर आपलं आवाज पोचणं कठीण होईल त्यामुळे आपल्या हक्कांसाठी आता बिनधास्त, निर्भीस्तपणे उतरून लढा पुढे त्यांनी हे देखील संगीतले की हे आंदोलन आपल्याला रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवून दिवे लावून न करता आपल्या सुरक्षेचा विचार करत फक्त इंकलाबचे नारे देत करायचे आहे।
व शेवटी त्या बोलल्या हे आमरण उपोषण तो पर्यंत थांबनार नाही जो पर्यंत पंतप्रधान वटहुकूम काढत नाहीत.
No comments:
Post a Comment