किनवटमध्ये आज 6 बाधितांची भर
किनवट ( तालुका प्रतिनिधी) : किनवटमध्ये गुरूवारी (दि. 27) सायंकाळी 6.43 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 4 व रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 2 असे एकूण 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 152 झाली आहे. आजपर्यंत एकूण 66 व्यक्तींना सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 60 रुग्ण उपचार घेत आहेत. 6 रुग्ण संदर्भिय सेवेसाठी इतरत्र दाखल आहेत.
आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या एस.व्ही.एम. कॉलनीतील 53 वर्षाचा 1 पुरुष, गंगानगरमधील 45 वर्षाचा 1 पुरुष, नालागड्डा येथील 61 वर्षाचा 1 पुरुष, गोकुंघाच्या दत्तनगरमधील 45 वर्षाची 1 महिला, बोधडी (बुद्रूक ) येथील 32 वर्षाची 1 महिला, मांडवा येथील 45 वर्षाचा 1पुरुष यांचा समावेश आहे.
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 17, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 43 अशा एकूण 60 व आज 1 व पूर्वीचे 5 असे एकूण 6 संदर्भित रुग्ण सेवेसाठी इतरत्र दाखल केले आहेत. अशा एकूण 66 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
दि. 27/08/2020 सायंकाळी 6.43 वाजता
आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब- 359,
निगेटिव्ह स्वॅब-207,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या- 4
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 2
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट - 21
निगेटिव्ह अहवाल - 19
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 2
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -6
आज मृत्यू - 0
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-7,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -152,
आज सुटी दिलेले-0
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-66,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-60 ( + 6 संदर्भित इतरत्र उपचार घेताहेत )
Thursday 27 August 2020

किनवटमध्ये आज 6 कोरोना बाधितांची भर
Tags
# तालुका
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
तालुका
Labels:
तालुका
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment