राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांच्या मागणीला यश राज्यभर राबवण्यात येणारे कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 27 August 2020

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांच्या मागणीला यश राज्यभर राबवण्यात येणारे कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान


नांदेड दि. 27 -
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबवण्यात येणारे कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांनी यशस्वी पार पाडले आहे. मांजरमकर यांनी स्वतः आपल्या काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्व शाळा, विद्यालय व खाजगी क्लासेस यांना प्रत्यक्ष भेटी देऊन कोविड शिक्षण शुल्कनीती समजावून सांगत हे अभियान यशस्वी केले आहे.
मागील काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालये व खाजगी शिकवणीमध्ये शैक्षणिक शुल्क पालकांकडून जबरदस्तीने घेताना आढळून येत होते, तर काही ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना आढळून येत होते. परंतु या करोना काळात पालकवर्गाचे बरेच नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले गेलेले आहे. अशा परिस्थितीत  शाळा, महाविद्यालये, क्लासेस यांनी शुल्क निश्चिती आणि विद्यार्थ्यांकडून शुल्क मागणी याबाबत निश्चित धोरण ठरवणे गरजेचे होते. म्हणून करोना काळात विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसकडून कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान राबवले या अभियानाअंतर्गत खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या होत्या.
शासनाने सूचित केल्याप्रमाणे कोणत्याही शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ करू नये, शक्य असेल तेवढे शुल्क पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चर्चा करून शैक्षणिक संस्थांनी कमी करावे, निश्चित केलेले शुल्क टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी आराखडा आखावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी, कोणत्याही परिस्थितीत पालक किंवा विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये त्याचबरोबर केवळ शुल्क न भरल्याचे कारण दाखवत कोणत्याही विद्यार्थ्यांला कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित ठेवू नये. या सर्व मागण्या संबंधितांकडून मान्य केल्याचे पत्र श्रीकांत मांजरमकर यांना नुकतेच देण्यात आले आहे व त्यांच्या काही मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहचवण्याची विनंती देखील केली आहे. मांजरमकर यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे सर्व पालक व विद्यार्थी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Pages