मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम घोषीत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 27 August 2020

मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम घोषीत



नांदेड  दि. 27 :- मा. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनाकांवर आधारीत विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम पुढील प्रमाणे घोषीत केला आहे.   

गुरुवार 27 ऑगस्ट 2020 पर्यंत दावे हरकती निकाली काढणे. सोमवार 7 सप्टेंबर 2020 पर्यंत मतदार यादीची तपासणी करणे व अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यास परवानगी प्राप्त करणे. शुक्रवार 18 सप्टेंबर 2020 पर्यंत डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्याची छपाई करणे. शुक्रवार 25 सप्टेंबर 2020 पर्यंत मतदार यादीचे अंतिम प्रकाशन करणे. याप्रमाणे सर्व जनतेने अयोगाच्या या कार्यक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages