नांदेड : 15 ऑगस्ट दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागातील मजदूर युनियनच्या कार्यालयामध्ये भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी दक्षिण मध्य रेल्वे मध्ये कार्यरत असलेले सेवावरिष्ठ कर्मचारी श्री उत्तम तारासिंग चव्हाण यांच्या शुभहस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. श्री. उत्तम चव्हाण हे रेल्वेच्या इलेक्ट्रिशियन विभागात सीनियर टेक्निशियन म्हणून मागील 38 वर्षापासून आपली सेवा बजावत आहेत. ते लवकरच आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होणार आहेत.
याप्रसंगी त्यांनी रेल्वे विभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे केलेल्या सेवेची दखल घेत मजदूर युनियनच्या व्यवस्थापकांनी श्री उत्तम चव्हाण यांना भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्याची संधी देऊन एक प्रकारे त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती दिली.
No comments:
Post a Comment