वामनदादांच्या गीतांनी आंबेडकरी चळवळीचे आत्मभान चेतविले; वामनदादा कर्डक यांच्या 98 व्या जयंती निमित्त विद्यार्थी संघटनांच्या वतीने अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 15 August 2020

वामनदादांच्या गीतांनी आंबेडकरी चळवळीचे आत्मभान चेतविले; वामनदादा कर्डक यांच्या 98 व्या जयंती निमित्त विद्यार्थी संघटनांच्या वतीने अभिवादन


औरंगाबाद : दि 15
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेयर असोसिएशन,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक यांच्या 98 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात येऊन 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी प्रा.डॉ. किशोर वाघ,प्रा.देवानंद पवार यांनी अभिवादन पर गीते सादर केली.
प्रा.किशोर वाघ यांनी शाहीर चळवळीचा त्या वामन परी जगावा,भीमा तुझा छोटा बाळ मी,पेर भीमाचा लळा शिवारी पेर भीमाचा लळा रे ही गीते करून कार्यक्रमात रंग भरला तर प्रा.देवानंद पवार यांनी माह्या मायेचं चित्रांग मले भारत दिसते ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.तसेच आदेश आटोटे यांनी अभिवादन पर गीत सादर केले.
यावेळी सचिन निकम यांनी वामनदादा कर्डक ह्यांनी आंबेडकरी चळवळीचे चक्र गतिमान करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले त्यांनी आंबेडकरी चळवळीतील पिढीला शेकडो वर्षे मार्गदर्शक ठरतील अश्या गीतांची रचना करून आंबेडकरी विचार खेड्यापाड्यात पोहचविले वामानदादांच्या गीतांनी आंबेडकरी चळवळीचे आत्मभान चेतविले असे प्रतिपादन केले.

यावेळी डॉ.किशोर सूर्यवंशी,सम्राट भुईगळ,रिपब्लिकन कामगार सेनेचे अशोक मगरे,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे,अविनाश डोंगरे,दिनेश नवगिरे,रिपब्लिकन सेनेचे ऍड.अतुल कांबळे,स्वप्नील गायकवाड,महेंद्र तांबे,गुरू कांबळे,सागर ठाकूर,विशाल इंगोले,सोमु भटकर,अक्षय दांडगे,वैभव इंगोले,कुणाल तायडे,शैलेंद्र म्हस्के,ऍड.सोमनाथ वाघमारे,पँथर सुनील शिंदे,अमोल होर्शीळ,जयश्री शिर्के,सुषमा गायकवाड,अक्षता दाभाडे आदींसह मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages