किनवट ,दि.१: मातंग समाज समता परिषदेच्या वतीने आज(दि.१) सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीचा मुख्य सोहळा बसस्टँड जवळील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे,शहराध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनीवास नेम्मानीवार, नगरसेवक जहीरोद्दीन खान,माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, वनवासी कल्याण आश्रमाचे गोवर्धन मुंडे, अनिरुद्ध केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, संतोष मरस्कोल्हे,गोकुळ भवरे, प्रा.डाॅ.सुरेंद्र शिंदे,प्रा.डाॅ.पंजाब शेरे, सुरेश पाटील, रिपाइं चे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक,प्राचार्य सागर शिल्लेवार, संपादक साजिद बडगुजर यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्ष तथा मातंग समाज समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष के.मुर्ती व कार्याध्यक्ष दुर्गादास बटूर यांनी केले होते.सामाजिक आंतर राखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी मातंग समाजातील अनेक गरजु व्यक्तींना आमदार भीमराव केराम व भाजपकडून अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment