वंचित बहुजन आघाडी-कुर्ला विधानसभा वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 1 August 2020

वंचित बहुजन आघाडी-कुर्ला विधानसभा वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न



चेंबूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त, वंचित बहुजन आघाडी -कुर्ला विधानसभेच्या वतीने बालविकास क्रीडा मंडळ हॉल चेंबूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेत ४० ते ४५ जणांनी रक्तदान केले

सर्वोदय हॉस्पिटल समर्पण ब्लड बँक परिवर्तन ग्रुप, बालविकास क्रिडा मंडळ, राजमिलिंद सोसायटी आणि भिमशक्ती मित्र मंडळ यांच्या सहकार्याने या शिबिराचे नियोजन केले होते.

शिबिर यशस्वितेसाठी स्वप्नील जवळगेकर ,अमोल पगारे, शैलेश सोनवणे, अनिल म्हस्के,प्रमेश्वर येडे, सुरेश येडे, हर्षा सुप्रिया मोहिते,आदींनी परिश्रम घेतले.

शिबारास -स्वेल वाघमारे , प्रदीप अडांगळे,आनंद जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ता आणि पक्षाचे पधअधिकारी यांनी भेट दिली.

No comments:

Post a Comment

Pages