मराठी साहित्यात एक चमत्कार वाटावा असे महान प्रतिभावंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी झाला अण्णाभाऊनी केवळ दीड दिवस शाळा शिकली. आयुष्यात पुन्हा शाळेची पायरी न ओलांडलेले दारिद्रय गरिबी आणि अस्पृश्यतेचे चटके अनुभवणारे अण्णाचे शाळेतील नाव तुकाराम होते.
अण्णाभाऊना शाहीर ही पदवी लाभल्याने ते लवकरच लोकशाहीर या नावाने मान्यता प्राप्त पावले अण्णाभाऊंनी आपल्या वैजयंता या कादंबरीतील प्रस्तावनेत असे लिहिले की जो कलावंत जनतेची कदर करतो तेव्हा जनता त्यांची कदर करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करत असतो माझ्या देशावर व जनतेवर आणि जीवनातील संघर्षावर अढळ विश्वास आहे. लोकशाहीर अण्णा भाऊचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते त्यांनी एके ठिकाणी म्हणतात जे मी स्वत: जगलो आहे पाहिले आणि अनुभवले आहेत.ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे देश सुखी हवा समृद्ध व्हावा आणि सभ्य व्हावा इथे समानता नांदावी असे त्यांनी स्वप्न पाहिले व याच स्वप्नाचे कृतीत रुपांतर करण्यासाठी त्यांनी कथा- कादंबरी पोवाडे यांच्याद्वारे माणूस पण कसे असावे लागते हे सांगण्यासाठी निरंतर लेखणी फिरविली ते आपल्या लेखणीच्या द्वारे हे संदेश द्यायचे की साथ ही हदयाने मिळावी लागते हे सत्य अण्णाभाऊनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले आणि त्यांची कष्ट करणाऱ्या
श्रमिकावर फार श्रद्धा आणि निष्ठा होती ते विश्वासाने म्हणायचे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. म्हणून त्यांनी श्रमिकांचे जीवन तितक्यांचे प्रामाणिक हेतूने निष्ठेने चित्रीत केले.
आपल्या संपूर्ण आयुष्यात शालेय शिक्षण अत्यंत कमी घेऊन औपचारिक शिक्षणाला पूर्ण विराम देणाऱ्या, अण्णाभाऊनी स्व्तःच्या अनुभवातून व प्रचंड मोठ्या प्रतिभासक्तीच्या जोरावर भल्याभल्यांना विचार करायला व आत्मचिंतन करायला भाग पाडले त्यांनी झुंजार लेखणीने फकीरा ही कादंबरी लिहिली व मार्च १९५९मध्ये बाबासाहेबांच्या लेखणीस अर्पण केली म्हणून आंबेडकरी असलेल्या सर्वांचा आवडता कथा लेखक अण्णाभाऊ साठे होय शाळा शिकता आली नाही पण शब्दसम्राट, साहित्यसम्राट अशा शब्दांचे संदर्भ आपल्या साहित्यात निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे साहित्यिक ही अण्णाभाऊ च्या अल्पशा आयुष्यातील महान कामगिरी आहे. अण्णाभाऊंनी अलगुज, वारणेचा वाघ, फकीरा, आवडी, संघर्ष इ, सारख्या उत्तमोत्तम कादंबऱ्या लिहिल्या व साहित्यकार बनले आपल्या साहित्यातून दलितांच्या दुःखाला वाचा फोडली ,त्यांनी स्त्रीला आगळेवेगळे स्थान दिले .
माझी मैना गावाकडं राहिली !
माझ्या जीवाची होतीया काह्यली!!
या त्यांच्या पोवाड्यातून त्यांचा प्रेमळ स्वभाव गुण स्पष्ट होतो. अशा या प्रेमळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
श्रीकांत संभाजी मगर मो ९६८९११७१६९
No comments:
Post a Comment