देगलूरात आज सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने बेशरम आंदोलन करण्यात आले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 29 August 2020

देगलूरात आज सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने बेशरम आंदोलन करण्यात आले   देगलूर(प्रतिनिधी):- देगलूर शहरात सुरू असलेल्या ड्रेनेजचे संथ गतीने चालू व झालेल्या कामात अनियमितता आहे 3 वर्षे होऊन गेले काम संथ गतीने चालू आहे पाडलेले खडे वेळेवर बुजवीत नसल्याने चालण्यासाठी येत नाही ते लवकरात लवकर काम पूर्ण करावे , व शहरातील रस्त्याचे चालू असलेले काम एस्टीमेंट प्रमाणे होत नाही त्यामुळे 2-4 महिन्यात त्यावर डाँबरिंग  करावे लागत आहे असे बोगस काम वेळीच थांबवून एस्टीमेंट प्रमाणे काम करावे या मागणीसाठी    सर्व जागृत नागरिकांच्या वतीने आंदोलनाचे आज नियोजन करण्यात आले यावेळी नगरसेवक चंदूसेट मैलागिरे, सय्यद मोहीयोद्दीन, दिगंबर कौरवार, बालाजी मैलागिरे, अशोक कांबळे देगलूरकर, विकास नरबागे,सुभाष अल्लापुरकर, राहुल सोनकांबळे, रवी उल्लेवार,कादरी,सुधाकर उल्लेवार, धनाजी जोशी, श्रीनिवास उल्लेवार,राज सोनकांबळे, यादव कांबळे,निर्भय पिंगळे, अभिषेक भास्करे, दयानंद कांबळे, राजेश भुताळे  व शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages