प्रसिद्ध गायक सदाशिव देवबा वाठोरे यांचा जन्म१आक्टोबर१९४६ साली हदगाव तालुक्यातील हरडप या गावी झाला.त्यांचे शिक्षण बी.ए.डी.एड.पर्यंत झाले .शिक्षकी पेशेतुन २००४ साली सेवानिवृत्त झाले.सध्या ते हदगाव येथे राहतात.
गायक सदाशिव वाठोरे यांना उपजतच गायणकला अवगत झाली .बालपणापासून गायणकला व नाट्यकला हा छंद त्यांनी जोपासला.शिकत असतांनाच पाठ झालेल्या कवीता गोड आवाजात सादर करत असत ."सिरियाल चांगुणा "या नाटकात त्यांनी चिल्या बाळाची भुमिका केली.काव्यगायण व गीतगायण यांचे लोकांनी खुप कौतुक केले. यातुन गायणाच्या कलेला प्रोत्साहन मिळाले.उमरखेड येथुन भावगीत स्पर्धेत निवड होऊन नागपुर येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन भावगीत स्पर्धेत त्यांनी प्रभावी गातगायण केल्याने त्यांना द्वितिय क्रमांक मिळाला.त्यानंतर अध्यापण करीत असतांनाही त्यांनी चालीवर कवीता गात असत. त्यांना आताही त्या कवीता मुखपाठ आहेत.शाळेतही ते सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत असत.
कलाजत्था प्रमुख म्हणुन साक्षरता अभियानात ही त्यांनी जनजागृतीचे काम केले.विभागीय स्तरावर जालना येथील समुह गीतगायण स्पर्धेतही कवितांचे सादरीकरण केल्याने त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.गायक सदाशिव वाठोरे यांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य सर्वांना परिचित असून त्यांची पत्नी वंदना सदाशिव वाठोरे ह्याही सामाजिक कार्यकर्त्या असून त्यांनी हदगाव तालुक्यातील गावागावात जाऊन महिला मंडळे स्थापन केलीत.
हदगाव तालुक्यातील हरडप हे गाव प्रबोधन चळवळीतील अग्रणी असलेले गाव.या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार समता सैनिक दलाची स्थापना झाली होती.विशेष सांगायचे म्हणजे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१९५६च्या धम्म दिक्षा सोहळ्यास कालवश ग्यानोबा राघोजी वाठोरे व पंचशील हायस्कूल चे विद्यमान अध्यक्ष ग्यानोबा विठ्ठल वाठोरे हे उपस्थीत होते .या ठिकाणचे गोदाजी ग्यानोबा वाठोरे हे पहिले साहित्यिक.त्यांना गोदाजी बुआ म्हणत.त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर "भीमलीला"संग्रह हा ओवीबद्ध ग्रंथ १९७०मध्ये लिहिला.या ग्रंथाला तत्कालीन भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडचे जिल्हाध्यक्ष डॉ.एस.पी.गायकवाड यांनी प्रस्तावना लिहिली आहे .तो ग्रंथ आजही माझ्या संग्रही आहे.तो ग्रंथ वाचणासाठी कोणाचे वाचन चांगलं आहे अशी विचारणा झाली तेंव्हा सदाशिव वाठोरे यांचे नाव समोर आले.इतर मंदिरात पोथी वाचली जायची तद्वतच ग्यानोबा राघोजी वाठोरे यांचे घरी सदाशिव वाठोरे या ग्रंथांचे वाचन करायचे व गोदाजी वाठोरे अर्थ सांगत असत.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुळापासुन ते महापरिनिर्वाणापर्यंत चे चरित्र यात ओवी रुपाने सांगण्यात आले आहे. गावातील असंख्य महिला व पुरुषांनी या ग्रंथ वाचनाचा लाभ घेतला. हरडप शिवाय अनेक गावांत ही या ग्रंथांचे वाचन झाले असल्याचे किनवट तालुक्यातील पेंदा (नागढव) येथील नामदेव भरणे यांनी मला निदर्शनास आणुन दिले.त्यांच्या संग्रही असलेला तो ग्रंथ मला त्यांनीच दिला.तेथुन पुढे गायक सदाशिव वाठोरे आंबेडकरी प्रबोधन चळवळीत उत्साहाने पुढे आले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणनतर अनेक कवी,गायक व शाहीर यांनी आंबेडकरी चळवळ गतिमान केली होती.दिनबंधु,दलितानंद वामनदादा कर्डक, शाहीर हनवते ,शाहीर साबळे, प्रतापसिंग बोदडे यांची गाणी प्रचलीत झाली.त्यांची गीतं हरडपच्या गायण पार्टीत प्रमुख गायक सदाशिव वाठोरे प्रभावीपणे गात असत.मला आठवते गायक सदाशिव वाठोरे यांचे लग्न सिरंजनी येथे झाले. लग्न रात्री उशिरा लागले हरडप येथील गायण पार्टीचा कार्यक्रम होता.स्वत: नवरदेव असुनही त्यांना गाण्याचा मोह आवरला नाही .त्यांनी वामनदादा कर्डक यांचे
नदीच्या पल्याड बाई,
झाडी लय दाटं
इथुनच जाते माझ्या ,
माहेराला वाटं ..
हे गीत गायलं मी लहान असतांना त्यांच्या लग्नाला वडीलासोबत उपस्थीत होतो.आताही त्यांचं ७४वयवर्ष चालु आहे तरी ते मधुर आवाजात गाणं गातात.
त्यांच्या गायण संचात मार्गदर्शक म्हणुन कालवश यादव वाठोरे, तबलावादक -माझे वडील कालवश रामचंद्र नरवाडे, हार्मोनियम वादक-तुकाराम वाठोरे,प्रमुख गायक सदाशिव वाठोरे यांच्यासह माधव वाठोरे, कालवश शाहीर किशन(गेंदु )वाठोरे,मारोती वाठोरे, कालवश परसराम वाठोरे असत. या गायण पार्टीत मी ही माझ्या वडीलासोबत भजनाला बालगायक म्हणुन जात असे व वामनदादा कर्डक याचं "आई तुझा मी नंदन आहे,पायी तुझ्या हे वंदन आहे "गीतं गात असे.
ही गायण पार्टी हदगाव तालुक्यात नावाजलेली असल्याने भीमजयंती,बुद्ध जयंतीसह इतर लग्नसमारंभ किंवा जागरण, या ठिकाणी चिठ्ठी पाठवुन निमंत्रण देत असत.तेथील कार्यक्रमात जाऊन जनप्रबोधन करत.गायक सदाशिव वाठोरे यांच्या गीतगायणाचे वैशिष्ट्य म्हणजे गोड ,मधुर आवाज व प्रभावी सादरीकरण.त्यांच्या गीतगायनाने रसिक लहान थोर प्रभावीत होऊन तल्लीन होत,गीत ऐकण्यासाठी गर्दी जमायची व मंत्रमुग्ध होऊन प्रबोधन ऐकत.रात्रभरही कार्यक्रम चालू असे. वंदन गीतापासून सुरुवात होऊन माधव वाठोरे यांच्या भीमराज माऊली या गीताने कार्यक्रमाची सांगता होत असे.
१९७३ या वर्षांपासून हरडप येथे माघ पौर्णिमेस भव्य धम्म मेळावा सुरु असुन या मेळाव्याची सुरुवात लोनंचे रामाबुवा यांच्या सुचनेनुसार सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग वाठोरे,व सदाशिव वाठोरे याच्या पुढाकाराने हा धम्म मेळावा सुरू झाला. गावातील समाजबांधवांच्या व बाहेर गावी असलेल्या कर्मचारी बांधवाच्या अर्थिक सहका-यातुन प्रजापती महिला मंडळव भीमनवयुवक मंडळ हरडप यांच्या पुढाकारातून आजतागायत हा धम्म मेळावा चालू आहे.गावातुन तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची गावातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणुक निघते यातही गायक सदाशिव वाठोरे यांची गायणपार्टी सर्वात समोर असायची व पाठीमागे महिलामंडळी बुद्धभीम गीतं गात असत, आजही गातात .यावेळी आजुबाजूच्या परिसरातील अनेक गावातील सगेसोयरे , लेकी बाळी गावचा भीम जयंती सारखाच हा सन म्हणुन हरडप येथे हजर होतात.तसेच अनेक नामवंत कवी गायक व शाहीर व विचारवंताना कार्यक्रमास बोलावुन प्रबोधन केले जाते.
ठिकठिकाणी कार्यक्रम-
त्यांच्या गायणपार्टीचे अनेक गावांत कार्यक्रम झाले.त्यांनी हदगाव,पारवा,पोटा,ल्याहरी,तामसा,आष्टी,सरसम, हिमायतनगर,सिरंजणी,कोठा,वाटेगाव,बनचिंचोली,अंबाळा,बिटरगाव इत्यादी ठिकाणी जाऊन तेथील जनतेचे गीतगायणातुन प्रबोधन केले.प्रतिस्पर्धी सोबत गीतगायण रंगायचे.शाहीर दयानंद साबळे उमरखेड यांच्या सोबतचा त्यांचा सामनाही ल्याहरी येथे रंगला होता.असे त्यांनी सांगितले.
मनपसंत गीते-
१)स्वत: लिहलेले-ज्यांना चातुरवर्णियांनी मारलं,
अशा दुबळ्यांना भीमानं तारलं.
२)फुलवा फुलांचे ताटवे,सर्वांच्या अंगणी
माळी तुम्ही व्हा तुमच्या बागेच्या माळणी.
३)काळजाचे होईल पाणी पाणी
पटाचाराची ऐका कहानी.
४)थांबा हो थांबा गाडीवान दादा,बाळ एकटा मी,भीवा माझे नाव,
राहिले फार दुर ,माझे गाव,
धगाडीत घ्या हो मला.
५)स्वातंत्र्या रे तुझ्याचसाठी दिले ज्याने प्राण
चरणाचाही तयाचा असे आम्हा अभिमान.
अशी एकापेक्षा एक सरस त्यांची रसिकांवर छाप पाडणारी गाणी आजही मी,भारत वाठोरे, गंगाधर वाठोरे,मनोहर वाठोरे ,प्रभाकर वाठोरे उल्हासित होऊन गुणगुणतो व भेट झाल्यावर त्या प्रेरणादायी गाण्याचा आवर्जुन उल्लेख करतो.
पुरस्कार-
शैक्षणिक कार्य करीत असतांना "कला जत्था प्रमुख" म्हणून साक्षरता अभियानात सहभागी होऊन प्रभावी साक्षरतेचे गीत गाऊन प्रबोधन केल्यामुळे तत्कालिन नांदेड चे जिल्हाधिकारी सुधीरकुमार गोयल यांनी पुरस्कार देऊन गौरव केला.
संदेश-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आजच्या तरुण पिढीने संघटित होऊन नेटाने चालवावी असा संदेश प्रसिद्ध गायक सदाशिव वाठोरे आपल्या गीतगायणाच्या माध्यमातून देतात.त्यांच्या प्रबोधन चळवळीतील कार्यास सलाम करतो.जयभीम.धन्यवाद.!
- आयु. महेंद्र नरवाडे, किनवट जि.नांदेड.मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment