किनवट ,दि.२ : भाजपा नेते तथा नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज(दि.२) शहर भाजपा व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात कंत्राटी सफाई कामगारांना आमदार भीमराव केराम यांचे हस्ते धान्य कीट व आर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती शताब्दी निमित्त अभिवादन करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्या कश्या घ्याव्यात याविषयी सखोल मार्गदर्शन केले. शहर भाजप आगामी काळात संघटनात्मक बदल करेल या विषयावरही त्यांनी प्रकाश टाकला.
अध्यक्षीय समारोप करतांना आमदार भीमराव केराम म्हणाले की, नांदेड जिल्हयात भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे रुजविण्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मोठे योगदान असून, प्रस्थापितांच्या एकहाती नेतृत्वाला त्यांच्या रुपाने एक कणखर विरोधक मिळाला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे खा.चिखलीकर यांचा वाढदिवस समजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचा मानस भाजपाच्या वतीने आखण्यात आला आहे, त्याचाच एक भाग म्हणून आपला जीव धोक्यात घालून लोकसेवा करणारे कोरोनायोध्दे, कंत्राटी सफाई कामगारांंचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी आम्ही धान्य किट व आर्सेनिक अल्बम-30 या गोळ्यांचे वाटप करून खा.चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा करत आहोत.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुधाकर भोयर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक नेम्मानीवार, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाबूराव केंद्रे, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष उमाकांत क-हाळे, प्रकाश टारपे, न.प.बांधकाम सभापती व्यंकट नेम्मानीवार, नगरसेवक शिवा आंधळे, नरेश सिरमनवार, शिवा क्यातमवार, मधुकर अन्नेलवार, उपस्थित होते. प्रा.विश्वास कोल्हारीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आपत्ती व्यवस्थापन समितीचे अनिरुध्द केंद्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे सतीश बिराजदार, सतीश नेम्मानीवार, आकाश भंडारे, भाजयुमोचे स्वागत आयनेनीवार, कृष्णा बासटवार, वैभव सिरमनवार, रजनीकांत राईंचवार, संतोष मरस्कोल्हे यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment