डाॅ.आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण :आरोपींवर कडक कारवाई करण्याची पॅंथर सेनेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 7 August 2020

डाॅ.आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण :आरोपींवर कडक कारवाई करण्याची पॅंथर सेनेची मागणीकिनवट ,दि.७ : माळेगाव (यात्रा) (ता. लोहा) येथे भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर जातीयवाद्यांनी भ्याडपणे केलेल्या दगडफेकीच्या विरोधात ऑल इंडिया पँथर सेना,शाखा, किनवट तालुका कमिटी तर्फे उपविभागीय अधिकारी यांना आज(ता.७) निवेदन देण्यात आले.निवेदनात डाॅ.आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
   या वेळी तालुका अध्यक्ष अजय पाटील,तालुका  उपाध्यक्ष मिलिंद कांबळे,तालुका सचीव सचिन गिमेकर,तालुका संघटक मारोती मुनेश्वर, कापसे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages