नांदेड(प्रतिनिधी)-आंबेडकरी चळवळीतील नेते आणि उद्योजक रुपक जोंधळे यांच्या निधनानंतर डॉ.आंबेडकरनगर मित्र परिवाराच्यावतीने दि.२६ ऑगस्ट रोजी डॉ.आंबेडकरनगर त्रिरत्न विहार परिसर,नांदेड येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
रमाई गॅस एजन्सीचे मालक, वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रुपकदादा जोंधळे यांचे हृदयविकारामुळे २३ऑगस्ट २०२० रविवारी निधन झाले. त्यांच्या या निधनाने तयार झालेली पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. डॉ.आंबेडकरनगर मित्र परिवाराच्यावतीने दि.२६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता त्रिरत्न विहार परिसर येथे त्यांच्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ.आंबेडकर मित्र परिवाराच्या वतीने प्रा.राजू सोनसळे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment