नामांतर शहिदांना हुतात्मा दिनी अभिवादन ;नामांतर शहिदांच्या स्मारकासाठी भीमसैनिकांचे विद्यापीठ गेट वर आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 4 August 2020

नामांतर शहिदांना हुतात्मा दिनी अभिवादन ;नामांतर शहिदांच्या स्मारकासाठी भीमसैनिकांचे विद्यापीठ गेट वर आंदोलन


आज दि ४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी जातीयवाद्यांच्या हल्ल्यात नांदेड येथे दि ०४ ऑगस्ट १९७८ रोजी  हुतात्मा झालेले शहिद  पोचिराम कांबळे,जनार्धन मवाडे यांना विद्यापीठाच्या कामानीलगतच्या शाहिद स्तंभावर अभिवादन करण्यात आले तसेच विद्यापीठात नामांतर शाहीदांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी तीव्र निदर्शने करण्यात आली.
तत्पूर्वी डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद हिरोडे यांच्या हस्ते शहिद जनार्दन मवाडे,पोचिराम कांबळे यांच्या प्रतिमेस व शाहिद स्तंभास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रोप्यमहोत्सवी 25 वे वर्ष साजरे करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून आंबेडकरी जनतेकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व शाहीदांचे स्मारक उभारण्यात यावे ही मागणी करण्यात येत आहे.तत्कालीन कुलगुरू डॉ.बी ए चोपडे यांनी रौप्यमहोत्सवी वर्षी शहिदांच्या वारसांना बोलवून त्यांचा सन्मान केला व लगेचच शहिदांच्या स्मारकाचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही नामांतर शाहीदांचे स्मारक उभारण्याची मागणी प्रलंबित असल्याने आज विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
तसेच नामांतर शाहीदांचे स्मारक तात्काळ उभारण्यात यावे,नामांतर शहिदांच्या वारसास विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्यात यावे ह्या मागणीचे निवेदन कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना सादर करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे,राहुल वडमारे,प्रा.प्रबोधन बनसोडे, ऍड.अतुल कांबळे,अविनाश डोंगरे, स्वप्नील गायकवाड,दिनेश नवगिरे,नितेश भोले,सोमु भटकर,अक्षय दांडगे,गुरू कांबळे,महेंद्र तांबे,सागर प्रधान,चिरंजीव मनवर, राहुल कांबळे,सागर बोकारे ,रवींद्र गवई,अजय शिंदे,ऍड.नागसेन वानखेडे ,सचिद्र गायकवाड,मयूर गायकवाड आदींच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले.
यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages