गीतकार संतोष मरीबा राऊत यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान- महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 4 August 2020

गीतकार संतोष मरीबा राऊत यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान- महेंद्र नरवाडे



[ प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती  ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत..संपादक ]
भाग - ५.

    गीतकार संतोष मरीबा राऊत यांचा जन्म १जानेवारी १९४७ला माहुर तालुक्यातील पाचोंदा गावी झाला.आतिशय प्रतिकुल परीस्थिती .शिक्षण झाले नाही.मिस्त्री काम हा त्यांचा व्यवसाय. वडील तबलावादक, आई पेटी वाजवायची . गायन कलेचा वारसा घरातच असल्याने संतोष राऊत यांना गायणाची आवड निर्माण झाली.घरीच संच तयार झाला. नंतर मुळावा येथील भदंत धम्मसेवकजी यांनी मुळाव्याला पहीली धम्म परिषद घेतली त्या धम्मपरिषदेत त्यांना गीत गाण्याची संधी मिळाली.भदंत धम्मसेवकजीने खुप मोठा गायक हो अशी शाबासकी दिली. तेथूनच प्रेरणा मिळाली.नंतर भजन पार्टीत गीतं गाण्याला सुरवात केली.नंतर तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव वाढत गेला चिंतन सुरू झाले त्यातुनच आपणही  आपल्या गीत कल्पणा समाजासमोर मांडायला पाहिजे म्हणुन गीतं लिहिली.बुद्ध भिम प्रेरणा गीते हा गीत संग्रह प्रकाशित झाला. भजन पार्टीत स्वरचित गीताबरोबर लोककवी वामनदादा कर्डक यांची गीते गात असत .नंतर ते किनवटला आले .एस.एस., गायकवाड यांची संगीत साथ मिळाली, पुंडलिक घुले, सुदाम मुनेश्वर, जीवन लाटे, तबला साथ अशोक दवने यांची मिळायची अशा रितीने माहुर व किनवट परिसरात गावोगावी जाऊन ते प्रबोधन करीत आजुनही कार्य चालू आहे.

मनपसंत गीते-
१) तळागाळातील बहुजनांना देऊनी आधार
आमचा केला भीमाने उद्धार.
२)असता जरी गरीबी,प्रेमाने निट नांदा, थोडावेळ काढून भीम गौतमास वंदा.
३)माणसा माणसा तुझ्यासाठी भीम झीजले किती रे,कशी भ्रष्ट झाली तुझी मती रे.
४)फेक गोधडी भीमसैनिका उठ आता तु पेटुन रं
उठ आता पेटुनी ही बोले भीमाची लेखनी रं
५)भीमा कोरेगावी गावगुंडाने केला आम्हावर हल्ला
तुला लढायचे आहे ,समता सैनिक दला.
६)वादळाची झाली सावली रमाई
दिन दु:खीतांची माऊली रमाई.
अशा एकाहुन एक सरस गीत गायणातुन कवी गायक संतोष राऊत यांनी समाजाचे प्रबोधन केले.तसेच शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी ही त्यांच्या संचाने जनप्रबोधन केले.श्री तपासकर व श्री मोरे साहेब यांनी पाणलोट सप्ताहा निमित्त संधी दिली होती पाणी आडवा पाणी जिरवा, फळबाग लागवड या समंधाची गीतं गाऊन जन जागृती केली.

संदेश-
समाज संघटित झाला पाहीजे, तरुणांनी संघटना बांधावी, समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी समता व सुरक्षा यासाठी काम करावे असा संदेश ते समाज बांधवांना देतात.
गीतकार संतोष मरीबा राऊत यांच्या प्रबोधन कार्याला आजुन बळ मिळो ही मंगल कामना!

 - आयु.महेंद्र नरवाडे, 
किनवट जि.नांदेड 
मो.न.९४२१७६८५५०

No comments:

Post a Comment

Pages