किनवट,दि.१८:कोठारी(चि.)ते धनोडा फाटा या राष्ट्रीय महामार्गावरील घोटी(ता.किनवट) येथील नाल्यावरील पर्यायी पूल दुस-यांदा वाहून गेला आहे.यामुळे अनेक गावांचा किनवटशी असलेला संपर्क तुटला आहे.या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्वरीत पर्यायी पूल तयार करण्यात यावा,तसेच निकष्टदर्जाचे काम करणा-या कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी एका निवेदनाद्वारे आज(दि.१८) उपविभागीय अधिकाऱ्यांकडे 'संभाजी ब्रिगेड',या संघटनेने केली आहे.
निवेदनावर अजय कदम पाटील,संतोष डोनगे,आदित्य चव्हाण, राजेंद्र भातनासे यांच्या स्वाक्ष-या आहेत.लवकरात लवकर या पर्यायी रस्त्याचे काम करावे,अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने निवेदनात दिला आहे.
No comments:
Post a Comment