दि 18 ऑगस्ट:
आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची सर्व पक्षीय विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन संशोधक विद्यार्थ्यांकडे व्हायवा साठी पैशांची मागणी करणारे डॉ.प्रशांत अमृतकर यांना सेवेतून तात्काळ बडतर्फ करावे व लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी केली.
यावेळी शिष्टमंडळाला विद्यार्थ्याने शोध प्रबंध सादर केल्यानंतर 15 दिवसाच्या आता विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा घेण्यासाठी आदेश काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले तसेच विषय तज्ञ ,बहिस्थ परीक्षक येणे शक्य नसल्यास स्थानिक विषय तज्ञ,बहिस्थ परीक्षक यांच्या उपस्थितीत मौखिक परीक्षा घेण्यात येईल,व्हायवा साठी विषयतज्ञ,बहिस्थ परीक्षक यांच्या जेवण, निवासाची सोय करण्यासाठी विद्यार्थ्यांना धारेवर धरले जाते त्यावरही कारवाई करण्याची आमची भूमिका असल्याचे कुलगुरूंनी सांगितले लवकरच ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
ह्याप्रकरणी सर्व पक्षीय विद्यार्थी संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी सिनेट सदस्य ऍड विजय सुबुकडे,एम आय एम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ.कुणाल खरात,युवक काँग्रेस चे प्रवक्ते निलेश आंबेवाडीकर,वंचित बहुजन शिक्षक आघाडीचे डॉ.किशोर वाघ,रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम,एम आय एम चे प्रदेश सचिव प्रशांत वाघमारे,पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे,ऍड.अतुल कांबळे,मझर पठाण,अब्दुल रहेमान आलम खान,मोहिनमिन खान आदींची उपस्थिती होती.
Tuesday 18 August 2020
Home
मराठवाडा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठच्या सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचे कुलगुरूंना निवेदन; संशोधक विद्यार्थ्यांकडे व्हायवा साठी पैशांची मागणी करणाऱ्या डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यावर बडतर्फी ची कारवाई करण्याची मागणी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठच्या सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांचे कुलगुरूंना निवेदन; संशोधक विद्यार्थ्यांकडे व्हायवा साठी पैशांची मागणी करणाऱ्या डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यावर बडतर्फी ची कारवाई करण्याची मागणी.
Tags
# मराठवाडा
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
मराठवाडा
Labels:
मराठवाडा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment