12 सप्टेंबरपासून धावणार 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या, 10 सप्टेंबरपासून रिझर्वेशनला सुरुवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 5 September 2020

12 सप्टेंबरपासून धावणार 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या, 10 सप्टेंबरपासून रिझर्वेशनला सुरुवात



नवी दिल्ली - कोरोनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. या महामारीमुळे संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांप्रमाणेच भारतातही लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र यानंतर अनलॉकच्या माध्यमाने देशातील कामकाज हळू-हळू सुरू करण्यात येत आहे. अनेक क्षेत्रे खुली केली जात आहेत. भारतीय रेल्वेकडून देशात सध्या 230 रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. आता पुन्हा भारतीय रेल्वेने (Indian Railway) 12 सप्टेंबरपासून 80 नव्या विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी 10 सप्टेंबरपासून रिझर्वेशनलाही सुरुवात होणार आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके यादव यांनी आज ही माहिती दिली. 80 नव्या रेल्वेगाड्या अथवा 40 जोडी रेल्वे 12 सप्टेंबरपासून सुरू होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यादव म्हणाले, यासंदर्भात लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येईल. तसेच आवश्यकते नुसार, जेथे नव्या रेल्वेची आश्यकता भासेल तेथे अथवा जेथे मोठी वेटिंग लिस्ट असेल तेथे अॅक्चूअल रेल्वेपूर्वी एक क्लोन रेल्वेगाडी चालवली जाईल. याशिवाय परीक्षांसाठी अथवा अशाच एखाद्या कारणासाठी राज्य सरकारने मागणी केल्यास रेल्वेगाड्या चालवल्या जातील.


No comments:

Post a Comment

Pages