विद्यापीठाच्या विभाजनाचा घाट घालणाऱ्या अधिकार मंडळावरील सदस्यांना चाप लावा अन्यथा आंबेडकरी युवकांचा उद्रेकाला सामोरे जा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना ईशारा. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 September 2020

विद्यापीठाच्या विभाजनाचा घाट घालणाऱ्या अधिकार मंडळावरील सदस्यांना चाप लावा अन्यथा आंबेडकरी युवकांचा उद्रेकाला सामोरे जा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना ईशारा.आज रिपब्लिकन विद्यार्थी सेना पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची भेट घेऊन विभाजनाचा डाव हाणून पाडू,अधिकार मंडळावरील सदस्यांकरवी विभाजनाचा घाट घातला जात असल्याने सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य यांना चाप लावण्यात यावा अन्यथा विभाजनवादी सदस्यांना भीमटोला देण्यात येईल विभाजनाचा निर्णय तात्काळ रद्द करावा ह्या करीता नेमलेली अभ्यास समिती तात्काळ बरखास्त करावी ह्या करीता कुलगुरू मार्फत मुख्यमंत्री ह्यांना निवेदन पाठवण्यात आले.

यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, रिपब्लिकन कामगार सेनेचे अशोक भाऊ मगरे,
पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी चे गुणरत्न सोनवणे,
पँथर ऍड. अतुल कांबळे,महेंद्र तांबे,सागर प्रधान ह्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages