प्रशासन व व्यवस्थेच्या अनास्थे विरोधात जिल्ह्यातील पत्रकारांचे आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 September 2020

प्रशासन व व्यवस्थेच्या अनास्थे विरोधात जिल्ह्यातील पत्रकारांचे आंदोलन


नांदेड/प्रतिनिधी-कोरोनाबाधित पत्रकारांना वेळेवर औषध उपचार उपलब्ध करुन द्यावेत, व्यवस्थेतील अनास्थेचा बळी ठरलेल्या पुणे येथील दुरचित्रवाहिणीचे तरुण पत्रकार दिवंगत पांडूरंग रायकर यांच्या कुटुंबियांना तातडीने 50 लाखांचा निधी देण्यात यावा आदी मागण्यांसाठी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत आज जिल्ह्यातील पत्रकारांनी काळ्या फिती लावून काम केले. यावेळी पत्रकारांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर केले.
पुणे येथील दुरचित्रवाहिणीचे पत्रकार दिवंगत पांडूरंग रायकर यांचे वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्याने कोरोना आजाराने निधन झाले. तत्पूर्वी लातुर येथील एका पत्रकाराचेही अशाच पध्दतीने प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निधन झाले होते. प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून काम करावे, असे आवाहन नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले होते.  याला प्रतिसाद देत जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांनी आज सकाळपासूनच काळ्या फिती लावून आपल्या कामास सुरुवात केली. दुपारी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची भेट घेवून त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात दिवंगत पांडूरंग रायकर यांचा मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, कोरोना बाधित पत्रकारांची वाढती संख्या लक्षात घेवून शासकीय व धर्मदाय खाजगी रुग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी, पांडूरंग रायकर यांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांचा मदत निधी उपलब्ध करुन द्यावा, राज्यातील कोणत्याही पत्रकाराला ऍम्बुलन्स, ऑक्सीजन तात्काळ उपलब्ध करुन द्यावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी विभागीय सचिव प्रकाश कांबळे, जिल्हाध्यक्ष ऍड.प्रदीप नागापूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी, सुभाष लोणे, लक्ष्मण भवरे, महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, अभय कुळकजाईकर, रविंद्र संगनवार, अविनाश पाटील, प्रशांत गवळे, बजरंग शुक्ला, राजू गिरी, सुरेश काशिदे, नकुल जैन, नरेश दंडवते, नरेंद्र गडप्पा, अर्जुन राठोड, अमरदिप गोधणे, सचिन मोहिते, संजय सुर्यवंशी, कुवरचंद मंडले, राजकुमार कोटलवार, गोपाळ देशपांडे, मुजीब शेख, सतीश मोहीते, शिवराज बिच्चेवार, गौतम गळेगावकर, सचिन डोंगळीकर, किरण कुलकर्णी, आनंद शेवडीकर, ज्ञानेश्वर सुनेगावकर, करणसिंह बैस, नरेंद्र गडप्पा, महेश होकर्णे यांच्यासह प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे पत्रकार, छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages