पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रंमातील अंतिम सत्र,एटिकेटी व बँकलाँक च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा बहुपर्यायी किवा होम टेस्ट पध्दती ने घेण्यात याव्या - एनएसओएसवायएफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 September 2020

पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रंमातील अंतिम सत्र,एटिकेटी व बँकलाँक च्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा बहुपर्यायी किवा होम टेस्ट पध्दती ने घेण्यात याव्या - एनएसओएसवायएफ


नांदेड दि 4 प्रतिनिधी:
 कोरोना कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष2019-2020 च्या परिक्षा  स्थगित केल्या होत्या, पण संघटनेचे पहिल्या पासून असे म्हणने होते कि पदवी,पदव्युत्तर आणि  एम.फिल च्या अंतिम सत्र व अंतिम परिक्षा या बहुपर्यायी किवा होम टेस्ट पध्दती ने घेण्यात याव्या जेणे करुन केंद्रीय व इतर राज्यात पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना  अडचण निर्माण होणार नाही.असे निवेदन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री याना संघटनेनी मेल द्वारा दिले होते, हे मत UGC चे होते,या संदर्भात  मंत्री महोदयांनी निर्णय घेतला नाही पण अता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे , तसेच मा.राज्यपाल महोदयांनी आदेश दिले कि अंतिम सत्र वर्षाच्या परिक्षा त्वरीत घेन्यात याव्या.
संघटनेने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत.
   

1) विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा विचार करून  प्रति विषय 50 मिनीटांची बहुपर्यायी पद्धतीने किवा होम टेस्ट द्वारे परिक्षा घेण्यात याव्या...
2) बँकलाँग व एटीकेटी च्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या वरील पध्दतीने परिक्षा घेण्यात याव्यात.
3) अभियांत्रिकी  विद्यार्थ्यांच्या प्रथम,द्वितीय,तृतिय वर्षातीला एटिकेटी,बँकलाँग च्या परिक्षा न घेता प्रात्यक्षीक परिक्षा च्या गूणांवर त्यांचा निकाल जाहिर करावा.
4) या परिक्षा लागणारा खर्च अत्यल्प असल्यामुळे उरलेला परिक्षा फिस मधील निधी विद्यार्थी साह्य निधी म्हणून घोषीत करावा ।
        ह्या निवेदनावर नसोसवायएफ चे राज्य प्रवक्ता प्रा. सतिश वागरे शहराध्यक्ष संदिप जोंधळे, विद्यापीठ प्रतिनिधी अक्षय कांबळे कंधारकर सोशल मिडिया अध्यक्ष  शुभम दिग्रसकर यांच्या सह्या आहेत.
       

No comments:

Post a Comment

Pages