इसापूर धरण 95 टक्के भरल्याने पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 11 September 2020

इसापूर धरण 95 टक्के भरल्याने पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा


नांदेड दि. 11 :- येत्या काही दिवसात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास जलाशय प्रचालन आराखड्यानुसार पैनगंगा धरणातील अतिरिक्त पाणी नदीपात्रात सांडव्याद्वारे सोडण्यात  येईल. त्यावेळी पैनगंगा नदीला पूर येऊ शकतो. संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरीकांना आपली जनावरे, घरघुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात यावेत, असा सर्तकतेचा इशारा कार्यकारी अभियंता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी दिला आहे. 

पैनगंगा नदीवरील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापुर धरण 11 सप्टेंबर 2020 रोजी 95.65 टक्के भरले आहे.  धरण पाणी पातळी 440.56 मी आहे. इसापूर धरणाच्या वरच्या भागातील धरणे भरली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान झाल्यास धरण 100 टक्के भरणार आहे.

इसापूर धरणाचा जलाशय प्रचालन आराखडा मंजुर आहे. या मंजुर आराखड्यानुसार पुढील वेळापत्रकाप्रमाणे जलाशयामध्ये पाणीसाठा साठविणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त पाणी धरणात आल्यास जास्तीचे पाणी सांडव्याद्वारे धरणाच्या खालील बाजुस पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येईल.

दिनांक 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)- 440.79 एवढी आहे तर टक्के 97.70 असून 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. 440.86 एवढी आहे. तर टक्केवारी 98.61 आहे. दिनांक 16 ते 30 सप्टेंबर कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)- 440.97 असून 99.70 टक्केवारी आहे. 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. असून 440.94 आहे. तर टक्केवारी 99.40 एवढी आहे. दिनांक 1 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 75 टक्के विश्वसाहर्ता (पाणीपातळी) (मी)-441.00 असून 100 टक्केवारी आहे. 90 टक्के विश्वसाहर्ता पाणीपातळी मी. 441.00 असून तर टक्केवारी 100 आहे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कार्यकारी अभियंता ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 नांदेड यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Pages