सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात चौत्यभूमी येथे रिपाइंने केली निदर्शने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 10 September 2020

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात चौत्यभूमी येथे रिपाइंने केली निदर्शनेमुंबई दि.10 -   लॉकडाऊन नंतर आता अनलॉक  सुरू झाले आहे. राज्यात सर्व गाड्या; दुकाने;मॉल सुद्धा सुरू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या नियमांचे पालन करीत;सुरक्षित अंतर राखून सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत या मागणी साठी आज मुंबईत चैत्यभूमी येथे केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. खुली करा खुली करा चैत्यभूमी खुली करा अश्या  घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री अविनाश महातेकर हे उपस्थित होते.
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी राज्यभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले ) यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्या अंतर्गत आज मुंबईत चैत्यभूमी येथे आंदोलन करण्यात आले. चैत्यभूमी हा आंबेडकरी जनतेचा आत्मीयतेचा  श्रद्धास्थान आहे. असे न रामदास आठवले म्हणाले.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करू नये.मुख्यमंत्री हे एका पक्षाचे प्रमुख नसून ते राज्याचे प्रमुखआहेत. कंगना या दुखावलेल्या आहेत. त्यांना भेटून मी समजूत काढणार आणि त्यांना पाठिंबा देणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.  या आंदोलनात सिद्धार्थ कासारे; विवेक पवार; सोना कांबळे रवी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

             

No comments:

Post a Comment

Pages