देगलूर येथील सिद्धार्थनगर,रमाई नगरात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 September 2020

देगलूर येथील सिद्धार्थनगर,रमाई नगरात आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटपप्रतिनिधी:
कोरोना या विषाणूवर प्रतिबंधात्मक औषध
"आर्सेनिकअल्बम ३०"
या गोळ्या नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. त्यामुळे लोकप्रिय नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या संकल्पनेतुन व मागदर्शनाने, देगलूर नगर परिषद, सर्व होमिओपॅथी डाॅक्टर्स यांच्या माध्यमातून नगरसेवक सुशिलकुमार देगलूरकर यांच्या तर्फे नागरिकांना मोफत औषधाचे वाटप करण्यात आले. यावेळी नितीन बिरकंगन, राॅनी दुगाने, राहूल बिरकंगन, शिवराज कांबळे, रतनकुमार देगलूरकर, पृथ्वीराज वाघमारे, स्वप्नील देगलूरकर, राष्ट्रपाल कांबळे, सौरव कांबळे, धिरज वाघमारे, बोधि कांबळे, अतूल काळे, सुमित कांबळे, संघरत्न कांबळे, बबलू कांबळे व सुशीलकुमार देगलूरकर मित्र मंडळांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages