परतीच्या पावसामुळे कयाधू लाखाडी नदीला महापूर. प्रशासनाने तात्काळ पुरग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांकडे भागवत देवसरकर यांची मागणी. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 18 September 2020

परतीच्या पावसामुळे कयाधू लाखाडी नदीला महापूर. प्रशासनाने तात्काळ पुरग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांकडे भागवत देवसरकर यांची मागणी.



नांदेड, प्रतिनिधी, दि.18 सप्टेंबर

गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीचा पाऊस मुसळधार कोसळत असल्यामुळे हादगाव तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे बसला आहे, इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी सोडल्यामुळे कयाधू लाखाडी नदी व पैनगंगा नदी या संगमावरील अनेक गावांना पुरांचा मोठा फटका बसला  असून नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे पिके पावसामुळे,महापुराच्या पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीक नष्ट झाले आहे, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

मागील अनेक दिवसापासून हदगाव तालुक्यातील तामसा, पाथरड,वाळकी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहेत काल रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे कयाधू लाखाडी नदीला पूर येऊन पाथरड ,कंजारा, शिवनी, कोपरा वाळकी धानोरा बोरगाव टाकळा, लिंगापूर, रावणगाव,धोत्रा,कामारी या गावातील नदीकाठच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,प्रचंड मोठा पाऊस पडल्यामुळे पुराच्या पाण्याने रौद्र रूप धारण केला आहे, त्यातच पैनगंगा नदीत ईसापुर धरणाचे पाणी सुटल्यामुळे दोन्ही नदीच्या संगमावर पाण्याचा तुंबावा मोठा होत आहे,त्यामुळे या परिसरातील  शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून या सर्व नुकसान ग्रस्त पिकाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे वाहून गेल्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे, जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन पंचनामे सुरू करावे अशी मागणीही निवेदनाद्वारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर,हदगाव तालुकाध्यक्ष भगवानराव कदम वाळकीकर, विलासराव माने, अविनाश कदम, शेख रहीम, नितीन चव्हाण,अविनाश पवार,विठ्ठल पवार, शेषेराव तवर,विठ्ठल तवर,योगेश मोरे अनिल देवसरकर,मदन सूर्यवंशी अविनाश सूर्यवंशी आदींनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Pages