नांदेड,प्रतिनिधी :
स्वा.रा.ती.म.विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित नियमावलीत तात्काळ बादल करण्यात यावा या आधीचे निवेदन मा. उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य इंजि. स्वप्नील इंगळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठाने विद्यार्थ्यांनच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर उपाय योजना करत विद्यापीठाने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. परंतु स्वा.रा.ती.म.विद्यापीठाने अजून विद्याथ्र्यांना प्रश्न संच सुद्धा उपलब्ध करून दिलेला नाही आहे, परंतु परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाने जर चारही जिल्याच्या ह्या मागण्या मान्य केल्या नाही तर 22 September पासून उपोषणाला बसण्याचा इशारा स्वनिल इंगळे यांनी दिला आहे.
विद्यापीठाने आजपर्यंत सराव प्रश्न संच न दिल्यामुळे व त्याची तारिक पण ना जाहीर केल्या मूळे विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलावे त्या विद्यार्थ्यांनना नवीन परीक्षा पद्धतीनुसार परीक्षा देण्यास वेळ मिळेल.पण कोविड- 19 च्या अनुषंगाने प्रथम ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनच्या परीक्षा घेणे नसेल तर अश्या विद्यार्थ्यांना मागील उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या गुणांची सरासरी गृहीत धरून त्यांचा निकाल लावण्यात यावा. निकाल 50% अंतर्गत गुण व 50% MCQ पद्धतीने गुण देण्यात यावे व त्यानुसार अंतिम निकाल जाहीर करण्यात यावा. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाने प्रोक्टतोरड परीक्षा पद्धत रद्द केली आहे त्याच धर्तीवर ही पध्दत तात्काळ रद्द करावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने प्रत्येक परीक्षेचा पेपर का कालावधी 90 मिनिट दिलेला आहे त्यानुसार आपल्या विद्यापठाने तोच वेळ वाढवण्यात यावा. अश्या मागण्यांचे निवेदन मा.उदय सामंत यांना देण्यात आले आहे
Friday, 18 September 2020

विद्यापीठाने परिक्षे संदर्भात तात्काळ नियमावली जाहीर करावी-स्वप्नील इंगळे
Tags
# जिल्हा
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
जिल्हा
Labels:
जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment