किनवट ,दि.२० : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात सकल मराठा समाजाच्या वतिने छत्रपती शिवाजी राजे मंगल कार्यालय घोटी येथे दि. २० रोजी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या चिंतन बैठकीत राज्य शासनाचा जाहीर निषेध करीत आरक्षणास स्थगिती दिल्याने समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. या वेळी अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या संवेदनशील विषया संदर्भात शासनाने वेळीच योग्य पावले उचलली असती तर आरक्षणास स्थगिती देण्यात आली नसती. या उपर शासनाने पोलिस भरती काढुन मराठा समाजाच्या जखमेवर मिठ चोळले आहे.
तेव्हा लवकरात लवकर मराठा आरक्षणा वरील स्थगीती उठवावी, पोलीस भरती थांबवावी व केंद्र सरकारने या संदर्भात संसदेत कायदा करावा यासह अनेक बाबीवर बैठकित चिंतन करून येणार्या काळात सरकारणे आरक्षणाची स्थगीती उठवली नही तर मराठा समाज माफ करणार नाही असाही इशारा देण्यात आला. भविष्यात सनदशिर मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाज समन्वय समितीच्या वतनी सांगण्यात आले. या वेळी स्वयंस्फूर्तीने मराठा समाज उपस्थित दर्शवली हे मात्र विशेष दिसुन आले.
No comments:
Post a Comment