किनवट,दि.२०.: महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, नांदेडचे मावळते जिल्हाध्यक्ष जी.एस. मंगनाळे यांची संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. याबाबतचे पत्र संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे यांनी नुकतेच त्यांना दिले.
नांदेड अधिवेशन निरीक्षक तथा संघटनेच्या महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे व राज्य संघटक भुपेश वाघ, महिला राज्य कार्याध्यक्षा सुनंदा कल्याणकस्तुरे, महिला राज्य कोषाध्यक्षा रूखमा पाटील यांनी नुकतेच संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे,ती अशी;
नांदेड जिल्हा नुतन कार्यकारणी याप्रमाणे जिल्हा नेते ग.नु. जाधव, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, प्रमुख सल्लागार बी.टी. केंद्रे, महिला जिल्हाप्रमुख सल्लागार कविता गरूडकर.
No comments:
Post a Comment