नांदेड, दि. 19 :- अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथे कृषिविभाग व शिवास्था फॉर्मर प्रोडयुसर कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने हळद व केळी पिकावरील किड व रोनियंत्रणाबाबत चर्चासत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवीशंकर चलवदे, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले व मंडळ कृषि अधिकारी संजय चातरमल आदी उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामपविर्तन (स्मार्ट) तसेच शेतकरी गट व शेतकरी कंपन्यासाठी शासनाकडून देय असणाऱ्या अनुदान योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देशमुख यांनी हळद व केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत (पिकाचे संपुर्ण जीवनचक्र) तसेच त्यावरील विविध किड व रोगांची ओळख, किड रोगाचे रासायनिक व जैविक नियंत्रण आदी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी अनिल शिरफुले यांनी सोयाबिन ग्राम बिजोउत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंडळ कृषि अधिकाऱ्यांनी शेतकरी गट व फॉर्मर प्रोडयुसर कंपनी व महिला बचतगटाची क्षमता बांधणीबाबत सविस्तकर मार्गदर्शन केले. या चर्चासत्रास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हळद व केळी पिकावरील किड व रोग नियंत्रण चर्चासत्र यशस्वीरीत्या संपन्न झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment