एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉक राहिलेल्या विषयाच्या परीक्षा संदर्भात लवकर निर्णय घ्या - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे कन्हैया कदम यांचे साकडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 19 September 2020

एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉक राहिलेल्या विषयाच्या परीक्षा संदर्भात लवकर निर्णय घ्या - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे कन्हैया कदम यांचे साकडे



नांदेड 19 - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत नांदेड दौऱ्यावर असताना. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम व त्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉक राहिलेल्या विषयाच्या परीक्षा संदर्भात लवकर निर्णय घ्या या मागणीचे निवेदन दिले. कोविड 19 च्या जागतिक महामारीच्या संकटामुळे राज्य सरकारने प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या, त्यामुळे निकाल जाहीर करून त्यांना पास करण्यात आले. परंतु ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या सेमिस्टर चे विषय बॅकलॉक राहिले होते. त्यांच्या परीक्षाही रद्द झाल्याने हे  विद्यार्थी त्या बॅटल ऑफ भेटलो राहिलेल्या  विषयाच्या परीक्षा देऊ शकले नाहीत.यात पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे सुमारे चाळीस टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानुसार राज्यातील बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे साडेतीन ते चार लाख इतकी आहे. सध्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा विचार होत आहे. त्यामुळे एटीकेटी/ बॅकलॉक राहिलेल्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यांचे भविष्य अंधारमय होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे राहिलेल्या विषयाच्या परीक्षा तातडीने घेणे आवश्यक आहे. यासाठी विद्यापीठांना या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या संदर्भात लवकरात लवकर सूचना करावी व तातडीने या विषयी दखल घेऊन बॅकलॉक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा आणि सप्टेंबर अखेपर्यंत विद्यापीठांना परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावे, जेणेकरून बॅकलॉक च्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळेल या मागणीचे  निवेदन देण्यात आले. यावेळी रा.वि. काँ.चे फैसल सिद्दिकी, प्रसाद पवार अजिंक्य जाधव, रोहित पवार, अरुण देसाई, महेश कल्याणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.





No comments:

Post a Comment

Pages