ज्येष्ठ कवियत्री डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या वडिलांचे निधन.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 16 October 2020

ज्येष्ठ कवियत्री डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या वडिलांचे निधन..

 
औरंगाबाद :

आज दि. 16 ऑक्टोबर, 2020 रोजी दुपारी 12:00 वाजता अॅड. भारत अहिरे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. शिवाजी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ कवियत्री डॉ. प्रतिभा अहिरे मॅडम यांचे ते वडील.पत्रकार, चित्रंकार राजानंद सुरडकर यांचे ते सासरे.होते. आंबेडकरी चळवळीतील ते निष्ठावंत कार्यकर्ते होते.मिलिंद महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. प्रकाश आंबेडकर  यांच्या चळवळीशी  त्यांची बांधिलकी होती. पूर्वाश्रमीच्या  भारिप-बहुजन महासंघाच्या उभारणीत त्यांनी विशेष भूमिका पार पाडली होती. औरंगाबाद प्रबुद्ध जन पंचायतीचे ते माजी जिल्हाध्यक्ष होते. 16 ऑक्टोबर, 2020 रोजी सायं. 6:00 वा. हिवरखेडा रोड ,कन्नड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Pages