प्रशासनाने उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार बंद करा- आ. भीमराव केराम. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 16 October 2020

प्रशासनाने उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार बंद करा- आ. भीमराव केराम.

 


माहूर :(तालूका प्रतिनिधी) 

   माहुर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचे आमदार भीमराव केराम यांनी पत्र देवुनही प्रशासनाने थातुरमातुर पंचनामे करून आकडेवारी दिल्याने उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार बंद करा अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे.

  मागील १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान पावसाच्या संततधारेमुळे शेतक-यांच्या उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झाले. यात सोयाबीनच्या शेंगांमध्ये मोड फुटूले तर कापसाच्या बोंडात चीर फुटून शेतक-यांचे न भरून येणारे नुकसान करीत अतिवृष्टीने थैमान घातले. याबाबत किनवट माहूरचे आ. भीमराव केराम यांनी माहूर तहसीलदारांना लेखी निर्देश देवून शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून मावेजा मिळवून देण्याबाबत सुचना केल्या होत्या. 

       माहुरचे तहसीलदार सिध्देश्वर वरनगावकर यांनी गटविकास अधिका-यांसह तालुका कृषी अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना लेखी आदेश देत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पाहणी पंचनाम्याचे आदेश दिले होते. पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून अहवाल व पंचनामे कार्यालयात तात्काळ सादर करण्याचे आदेशीत केले होते.  असे असतानाही शेतकर्‍यांच्या पिकांची पाहण

 करताना मागची आकडेवारी देत शेतकर्‍यांच्या प्रचंड नुकसान होऊनही जखमेवर मिठ चोळण्याचा किळसवान प्रकार होत आसल्याने आ. केरामांनी असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. चुकीची माहिती देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती द्या. या पुढे शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा प्रकार घडला तर याचा उच्चस्तरीय पाठपुरावा केला जाई. कुणाचीगी गय केली जाणार नाही असे परखड प्रतिक्रिया दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages