राजधानीत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 15 October 2020

राजधानीत भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

 



नवी दिल्ली, 15 : थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी .जे. अब्दुल कलाम यांची जयंतीआज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली.


कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात  आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त  तथा अपर मुख्यसचिव शामलाल गोयल यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव डॉ. निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.


आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

                                       00000

रितेश भुयार/वि.वृ.क्र.97 /दि.15.10.2020

No comments:

Post a Comment

Pages