अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापसाचे पाहणी पंचनामा करण्याचे माहूर तहसीलदारांचे आदेश... आ. भिमरावजी केरामांच्या पत्राची दखल... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 15 October 2020

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापसाचे पाहणी पंचनामा करण्याचे माहूर तहसीलदारांचे आदेश... आ. भिमरावजी केरामांच्या पत्राची दखल... अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापसाचे पाहणी पंचनामा करण्याचे माहूर तहसीलदारांचे आदेश...


आ. भिमरावजी केरामांच्या पत्राची दखल...


किनवट प्रतिनिधी

  आ. केराम यांच्या पत्राची दखल घेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणी पंचनाम्याचे आदेश माहूरच्या तहसीलदारांनी कृषी विभागासह संबंधितांना दिले असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याची तंबी माहूर तहसीलदारांनी दिली आहे.

  मागील १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान पावसाच्या संततधारेमुळे शेतक-यांच्या उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झाले. यात सोयाबीनच्या शेंगांमध्ये मोड फुटूले तर कापसाच्या बोंडात चीर फुटून शेतक-यांचे न भरून येणारे नुकसान करीत अतिवृष्टीने थैमान घातले. याबाबत किनवट माहूरचे आमदार भिमरावजी केराम यांनी माहूर तहसीलदारांना लेखी निर्देश देवून शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून मावेजा मिळवून देण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्याची दखल घेवून माहूरचे तहसीलदार सिध्देश्वर वरनगावकर यांनी गटविकास अधिका-यांसह तालुका कृषी अधिकारी, सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना लेखी आदेश देत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पाहणी पंचनाम्याचे आदेश दिले असून पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पाहणी अहवाल व पंचनामे कार्यालयात तात्काळ सादर करण्याचे आदेशीत केले आहे. दरम्यान पाहणी करताना संबंधितांनी विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच नुकसानग्रस्त भागातून शेतक-यांची तक्रार आल्यास त्याची सर्व जबाबदारी त्या त्या कार्यक्षेत्रात कार्यरत कर्मचा-यांवर राहील अशी तंबी तहसीलदार वरनगावकर यांनी दिली आहे.


मागील दोन दिवसापुर्वी नुकसान ग्रस्त तालुक्याचा उल्लेख करून माहुर व किनवट तालुक्यात केवळ 10 शेतात नुकसान झाल्याचा उल्लेख असल्याने  शेतकरी चिंता ग्रस्त आहे. त्यामुळे  शेतक-यांनी घाबरून जावू नये. मी तहसीलदार माहुर यांना नुकसान पाहणी बाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून नुकसानीची अधिकृत संख्या अजुन प्राप्त झालेली नाही  त्यामुळे सर्व नुकसान ग्रस्त शेतकरी बंधवाना  पिकविमा व शासन मदत मिळन्यासाठी मि पाठपुरावा करीत आहे....

- आ. भिमरावजी केराम

No comments:

Post a Comment

Pages