राज्यातील ग्रंथालये तसेच संशोधन-प्रयोगशाळा खुल्या होणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 14 October 2020

राज्यातील ग्रंथालये तसेच संशोधन-प्रयोगशाळा खुल्या होणार

 



मुंबई, दि. 14 :- महान शास्त्रज्ज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. कलाम यांची उद्या (शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर) जयंती आहे. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर उद्या (दि.१५) पासून राज्यातील विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडीत संशोधन संस्थांतील प्रयोगशाळा आणि सर्व प्रकारची ग्रंथालये खुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे.


‘मिशन-बिगीन-अगेन’च्या अनुषंगाने निर्गमित निर्देशांमध्ये ग्रंथालये आणि संशोधन प्रयोगशाळा खुल्या करण्याबाबत नियमही नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड-१९ च्या आरोग्य दक्षतेच्या सर्व नियमांचे पालन करून या दोन्ही ठिकाणी नेहमीचे कामकाज करता येणार असल्याचे म्हटले आहे.


पुस्तकांवर अपार प्रेम करणारे आणि देशाला विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी अविरत झटणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित उच्च शिक्षण संस्थामधील संशोधन-प्रयोगशाळा आणि राज्यातील शासकीय व खासगी अशा सर्व ग्रंथालयांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे.


ग्रंथालये खुली होण्याने वाचनप्रेमी तसेच विविध विषयातील संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Pages