किनवट ( राजेश पाटील ):
स्थानिक आमदार विकास कार्यक्रम सन२०२०-२१ अंतर्गत किनवट/ माहुर चे आमदार भीमराव केराम यांच्या हस्तो आज गुरुवार ता.२९ रोजी वि.स.स. एस.डी.एच. गोकुंदा करीता व वि.स.स. माहुर यांच्या स्थानिक निधीतुन आज दोन रुग्ण वाहीकेचे लोकार्पण करण्यात आले रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा या उद्देशाने या रुग्ण वाहीकेचे लोकार्पण करण्यात आले या वेळी साने गुरुजी रुग्णालय परीवाराचे प्रमुख डॉ. अशोक बेलखोडे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे ,उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा चे अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे,माजी नगराध्यक्ष इसाखान सरदारखान, किनवट नगरीचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, माजी न.प. उपाध्यक्ष श्रीनीवास नेमान्नीवार, व्यंकट नेमान्नीवार, आदीवासी नेते नारायण सिडाम, अनिल तिरमनवार, गिरीश नेमान्नीवार, दत्ता आडे, बालाजी पावडे, मारोती भरकड, प्रकाश कुडमुते, निळकंठ कातले, संतोष मऱ्हसकोले, रामेश्वर गिनगुले आदी उपस्थित होते .
No comments:
Post a Comment