अल्पभूधारक शेतकऱ्याचं पोरगा बनला वंचित युवक आघाडीचा प्रदेश सदस्य ..! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 31 October 2020

अल्पभूधारक शेतकऱ्याचं पोरगा बनला वंचित युवक आघाडीचा प्रदेश सदस्य ..!

 


नाशिक:

 वंचित बहुजन आघाडीची युवक प्रदेश कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली . पक्षाच्या भुनिके प्रमाणे ओबीसी समूहातील निलेश विश्वकर्मा हे प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्त झाले . परंतु या नवनियुक्त कार्यकारणीतील उल्लेखनीय बाबा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पुरोगामी विचारांचे युवा व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले चेतन गांगुर्डे यांना पक्ष श्रेष्ठीनी संधी दिली आहे . 

चेतन गांगुर्डे हे एक अल्पभूधारक शेतकरी कुटूंबातील युवक असून गेल्या आठ वर्षा पासून सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय आहेत . त्यांना मिळालेल्या या संधी मुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा आवाज बनुन ते विविध प्रश्नांवर आंदोलन उभे करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे .

या निवडीने नाशिक जिल्हा वंचित मध्ये उत्साहाचे वातावरण आहे . विद्यार्थी , युवक , शेतकरी प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सन्मान वंचित आघाडीच्या पक्ष श्रेष्ठीनी केला असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले

No comments:

Post a Comment

Pages