ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी ची बाईक रॅली-- परस्पर केलेल्या त्रिपक्षीय कराराचे प्रतिकात्मक दहन-कोयता बंद आंदोलनाचा इशारा.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 31 October 2020

ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी ची बाईक रॅली-- परस्पर केलेल्या त्रिपक्षीय कराराचे प्रतिकात्मक दहन-कोयता बंद आंदोलनाचा इशारा..

 



शिरोळ:

दि31- केवळ 14% मजुरी वाढ देऊन शासन आणि कारखाना प्रतिनिधी यांनी ऊसतोड मजुरांच्या न्यायी मागण्यांची थट्टा केली आहे.ऊसतोड कामगार प्रतिनिधी-साखर संघ-आणि साखर कारखाना प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेला त्रिपक्षीय करार हा फसवा असून त्याचा पुनर्विचार झालाच पाहिजे, या मागणी साठी वंचित बहुजन आघाडी, शिरोळ च्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढत या कराराचा निषेध केला सोबतच या त्रिपक्षीय कराराचे जाहीर दहन करून निषेध नोंदविण्यात आला.

सदरच्या बाईक रॅली ची सुरवात शिरदवाड येथून करण्यात आली, टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखाना च्या गेटसमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने करून आपले निवेदन सादर केले त्यांनतर तहसील कार्यालय शिरोळ येथे भेट देऊन आपल्या मागण्या मांडत जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर संपूर्ण तालुक्यातून असहकार आंदोलन उभे केले जाईल असा इशारा पदाधिकाऱ्यां च्या वतीने देण्यात आला. त्यांनतर शिरोळ येथील दत्त साखर कारखाना येथे प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या आंदोलनाची भूमिका कार्यकर्त्यांनी सांगितली व सोबतच निवेदन ही सादर करण्यात आले.

दत्त साखर कारखान्याच्या समोर या त्रिपक्षीय कराराचे दहन वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष वैभव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. "शासनाची ऊसतोड मजुरांच्या बाबतीत भूमिका अतिशय उदासीन असून कारखान्याचे हित जोपासत आहे. ऊसदर दरवर्षी वाढ होते पण ऊसतोड मजुरांची मजुरी,मुकादमांचे कमिशन,वाहनचालक यांच्या बाबतीत तीन वर्षे ने क्षुल्लक वाढ केली जाते. शासनाने जर याचा पुनर्विचार केला नाही तर कोयता बंद आंदोलन पुकारले जाईल व आम्ही कारखान्याला एकही वाहन सोडणार नाही" असे मत त्यांनी मांडले.

" ऊसतोड कामगार हा मजबूर असून तो वेठबिगारा सारख आयुष्य जगत आहे,त्याच्या राहण्याच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाणी,सुरक्षितता,त्यांच्या मुलांचे शिक्षण,महिलांची सुरक्षा,आरोग्य यांची कुठलीही जबाबदारी शासन किंवा कारखाना उचलत नाही, त्यांचा असंघटित पणाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून जुलमी पद्धतीने काम करून घेतले जात आहे..ही बाब निंदनिय आहे असे मत अक्षय कांबळे यांनी व्यक्त केले.. 

यावेळी, जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष वैभव कांबळे, उपाध्यक्ष विश्वास शिंगे ,युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप कांबळे, ऍड.बुद्धभूषण कांबळे,मच्छिंद्र कांबळे, राजू कांबळे, अर्जुन कांबळे,सुयश कांबळे,उल्हास कुरणे आणि तालुक्यातील इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages