कोण आहेत.. दिपक कदम सर...? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 1 November 2020

कोण आहेत.. दिपक कदम सर...?

 .. ज्यांनी आंबेडकरवादी मिशनचे स्वप्न युवावस्थेत पाहीले आणि साकार केले..

-ज्यांनी B.A. 1st-2nd year ला असतांनाच #आंतरराष्ट्रीय_मुद्द्यांवर_लीखान चालु केल आणि तेच लीखान  संपादकीय मध्ये प्रकाशीत केले जाऊ लागलं. याच लीखाना विषयीची एक आठवण ते नेहमी सांगतात की मला याच फार समाधान वाटत असे की आज माझा लेख एका मनुवाद्याच्या (जोशीच्या) लेखाच्या वर प्रकाशीत केल्या जातोय आणि हे सर्व फक्त माझ्या बाबासाहेंबांमुळं. त्याच जोशीने आदरनीय दीपक कदम सरांना निरोप पाठवला की मला भेटायला या. सर त्यांच्या कार्यालयात भेटायला गेल्यावर जोशी आरामदायी खुर्चीवर बसलेला, त्याने समोरून येणाऱ्या मुलाला बजावुन म्हणाला, तु कशाला आलास तुझ्या साहेबांना दिपक कदमांना पाठव..तो मुलगा शांतपणे उत्तरला सर मीच दिपक कदम आहे.. जोशी बसल्याचा ताडकन उभाच झाला त्याला काय करावे हे सुचेनासे झाले, शरीरभर घामाचे लोट वाहू लागले त्याने स्वतःची खुर्ची सरांना बसायला दिली...आणी चर्चा सुरू झाली असे आहेत आमचे सर... #आदरणीय_दिपक_कदम_सर

-ज्यांनी वयाच्या २१ व्या वर्षीच MPSC ची तहसीलदर ही मोक्याची आणी माऱ्याची जागा काबीज केली.

-ज्यांनी sc, st, obc, vj-nt, nt-b,c, मराठा, लिंगायत, मुस्लीम या समाजातील मुलांनी आंबेडकरवादी अधीकारी व्हावे म्हणुन त्यांना रहाण्यासाठी होस्टेल आणि २४ तास अभ्यासीका #समाजाच्या_दानावर नांदेड शहरात आणि दिल्ली सारख्या राजधानीमध्ये उभारली..येथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे एका *राजकारणी पुढाऱ्याने देऊ केलेले १ कोटी रूपये नाकारले..*

-ज्यांनी #अविवाहीत_जीवनाचा स्वीकार केला..

-१८ तास अभ्यास उपक्रमाचे प्रणेते.

-ज्यांनी याच मिशनच्या माध्यमातून १५० पेक्षा जास्त #IAS_Officer या देशाला दिले आहेत.

-रोज २० तासांपेक्षा जास्त वाचन करतात

-४० वय असतांना सातत्याने ४ तासांपेक्षा जास्त वेळ ऊभे राहून मुलांना शिकवतात.

-त्यांच्याविषयी एक आठवन सांगायची म्हणजे
मिशन मध्ये प्रत्येकाला संधी दिली जाते तीच संधी माझ्यावर आली होती संधी अशी होती की त्या दिवशी आमच्या २ नं खोलीच्या मुलांना संपुर्ण मिशन मँनेज करायचं होत..सर्व आम्ही मुलं तयारीनिशी संध्याकाळ पर्यंत मिशन व्यवस्थित मँनेज केलं..आता वेळ होती ती जमाखर्चाचा हिशोब सरांना देण्याची..त्यासाठी मी आणी माझा एक मित्र तयार झालो..मला फार उत्सुकता लागली होती की आज मी सरांना त्यांच्या घरी जाऊन भेटणार, सर ऐवढ मोठ मिशन चालवतात म्हणजे घरी एक ३२ इंच T.V. असेल, A.C. लावुन तोच T.V. पाहतही असतील, आलीशान बेड असेल, असे ऐशोआरामीचे विचार माझ्या मनाच सुरू झाले..हे विचार करत असतांना आम्ही सरांच्या खोली जवळ पोहचलो..
मित्र समोर आणी मी त्याच्या पाठीशी दारापुढे ऊभे राहून

मित्र- May I Come In Sir
आतुन एक प्रेमळ आवाज आला "या पोरं हो या"

मी आत मध्ये शीरताच माझ्या काचेच्या विचारांचा डोंगर खाली पडून चुर चुर झाला कारण मी पाहीलेलं दृश्य वेगळच होत ती फक्त १० बाय १० ची खोली होती, उजव्या हाताला एक टेबल त्यावर नुसती पुस्तके तो टेबल सुध्दा दिसत नव्हता फक्त पुस्तकेच दिसत होती, टेबल वर उजेडासाठी एक ट्युब, त्याच ट्युबखाली बयुन सर अभ्यास करतात, त्यांच्या पाठी एक छोटी हवेसाठी खिडकी, बाजुला लागुनच त्यांचा बेड,  बेडला लागुनच एक रँक त्यात सुध्दा भरगच्च पुस्तके, जीकडे नजर टाकावी तीकडे फक्त आणी फक्त पुस्तकच होती, आणी दोन कोट लटकवलेले होते..हे पाहून वाटले कीती हा जीवनातील संघर्ष...!
फक्त समाजासाठी, माझा समाज अधीकारी बनला पाहीजे यासाठी..
कदाचीत काही समाजबांधवांना दिपक कदम कोण आहे हे सुध्दा माहीत नसेल त्यांच्यासाठीच ही पोष्ट आहे..

-प्रत्येक व्यक्ती जो कोणी ही पोष्ट वाचत असेल त्याने आंबेडकरवादी मिशन ला जाऊन भेट द्या पुढे हेच आंबेडकरवादी मिशन बौध्द पर्यटन स्थळ म्हणुन नावारूपास येईल....

पत्ता- आंबेडकरवादी मिशन, आंबेडकर चौक, सिडको, नांदेड

                          
-मेघानंद इंगोले                   ८९७५८५७८९१

No comments:

Post a Comment

Pages