ग्रंथालये सुरु करण्याची परवानगी द्यावी :किनवट-माहूर ग्रंथालय संघाची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 13 October 2020

ग्रंथालये सुरु करण्याची परवानगी द्यावी :किनवट-माहूर ग्रंथालय संघाची मागणी

 किनवट ,दि.१३:सार्वजनिक ग्रंथालये अंशत:का होईना कोविड धोरणाचे सर्व नियम व अटी पाळून चालु करण्यास परवानगी देण्यात यावी,या प्रमुख मागणीसह अन्य चार मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात किनवट व माहूर तालुका संयुक्त ग्रंथालय संघाच्या वतीने नुकतेच देण्यात आले.नायब तहसीलदार मोहंमद रफिक यांनी निवेदन स्विकारले.

    कोविड महामारीमुळे राज्यातील सर्वच ग्रंथालये २२ मार्च पासून बंद आहेत.यामुळे ग्रंथालयातील ग्रंथपाल, सेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपासमार होत आहे.या पाश्र्वभूमीवर दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत,त्या अशा;सार्वजनिक ग्रंथालयाचे गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेले अनुदान दुप्पट करण्यात यावे,राज्यातील ग्रंथालयाचा चालु वर्षातील अनुदानाचा पहिला हप्ता त्वरीत वितरीत करण्यात यावा,कोरोना काळात ग्रंथालये बंद असल्याने सार्वजनिक ग्रंथालये व पर्यायाने कर्मचाऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. म्हणून किमान त्या काळातील वाचकाकडून वसूल  होणाऱ्या वर्गणी इतकी रक्कम मदत म्हणून ग्रंथालयांना देण्यात यावी व राज्यातील ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागु करण्यात यावी.

      निवेदनावर किनवट व माहूर तालुका संयुक्त ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अँड.मिलिंंद सर्पे, कार्याध्यक्ष उद्धवराव रामतिर्थकर,सचिव प्रा.दगडू भरकड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages