किनवट: (तालुका प्रतिनिधी)
आ. भीमराव केराम यांच्या पत्राची 24 तासात दखल घेत रेल्वे मंत्रालयातर्फे नंदिग्राम एक्सप्रेस मुंबई ते किनवट पर्यंत सोडण्यात आली आहे. या विषयीचा नुकताच संदेश रेल्वे मंत्रालयातर्फे प्राप्त झाला असून नागरिकांनी आनंद व्यक्त केले आहे.
किनवट सारख्या आदिवासी, दुर्गम भागातून औरंगाबाद, मुंबईला जाण्यासाठी नंदिग्राम ही एकमेव रेल्वे होती. परंतु तीही नांदेड पर्यंत येणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. त्यातही नांदेड 150 किमी अंतरावर असल्याने गरीब सर्वसामान्य नागरीकांचे प्रचंड हाल होत होते. त्यामुळे मुंबईस जाने नागरिकांसाठी अशक्यप्राय बनले होते.
या सर्वाची दखल घेत आ. भिमराव केराम यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना ताबडतोब पत्र व्यवहार करित माझ्या किनवट मतदार संघातील 50 टक्के गरिब जनता असुन प्रवासासाठी रेल्वे हे एकमेव साधन आहे. तर कॅन्सरग्रस्तांना मुंबई येथे उपचार करण्यासाठी एकमेव पर्याय आहे अशा वास्तव परिस्थीतीची जानीव करुन दिली. याची तात्काळ दखल घेत नंदिग्राम एक्सप्रेस किनवट पर्यंत सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घेतला असून वेळापत्रकही प्रसिद्ध केला आहे. तर कृष्णा एक्स्प्रेस सुद्धा सुरु करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे कळते आहे. या सर्व प्रक्रियेत दाखविलेल्या तत्परतेबद्दल नागरीकांनी आ.केराम यांच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment