धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त साहित्यांनद प्रतिष्ठानचे ऑनलाईन कवीसंमेलन!
नांदेड प्रतिनिधी:
साहित्यानंद प्रतिष्ठान महाराष्ट्र शाखा - नांदेड तर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता गुगल मिटच्या माध्यमातून ऑनलाईन कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक अनुरत्न वाघमारे कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. सदर कवीसंमेलनाचे नियोजन जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कदम (सन्मित्र) व साहित्यानंद प्रतिष्ठान नांदेड जिल्हा कार्यकारिणीने केले आहे.
कविसंमेलनात रमेश मुनेश्वर, सौ.दीपाली कुलकर्णी, नासा येवतीकर,रुपाली वागरे-वैद्य,नागोराव डोंगरे,कैलास धुतराज,शंकर गच्चे,पांडुरंग कोकुलवार,प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड,प्रा.विलास हनवते, मनोहर बसवंते,राहूल जोंधळे, मिनाक्षी येगुनवार,भाग्यश्री आसोरे,हिरालाल बागुल,दत्ताहरी कदम,पंडीत तोटेवाड आदि मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. कवी,गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वातंत्र्य,समता,बंधुत्व ,न्याय या मूल्यांचा संदेश समाजात जावा यासाठी साहित्यानंद प्रतिष्ठानकडून महाराष्ट्रभरात जवळपास १३ जिल्ह्यांत आणि बेळगावमध्येही एकाच दिवशी या ऑनलाईन कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय वडवेराव यांनी दिली.
https://writersmanch.blogspot.com/2020/10/is-value-of-journalism-disappearing.html
ReplyDelete