किनवट दि.८: सामाजिक उन्नती बरोबरच महिलांचा आर्थिक विकास आवश्यक आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी राजेश धुर्वे यांनी केले.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा किनवट व गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्था, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशपूर-जुने(ता. किनवट) येथे शेळीपालन व्यवसाय सुरु करण्यात आला आहे.याचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.यावेळी ते बोलत होते .
शेळीपालनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी व ग्रामीण भागात बदल घडवुन आणण्या करीता आर्थिक सहाय्याची गरज भासते. ती गरज व त्यांचा जे. एल.जी. समुहा मधील महिलांचा प्रामाणीकपणा चिकाटी ओळखुन बँक त्याना मदत करते,असे धुर्वे यांनी सांगीतले.
यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँक मुख्य शाखा, किनवटचे शाखा व्यवस्थापक ओ. एम. शेख, प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, गृहलक्ष्मी महिला ग्रामविकास संस्था किनवट (NGO) अध्यक्षा संगीता पाटिल, समाज सेवक पंढरीनाथ ठाकरे, किनवट न्युजचे संपादक गंगाधर कदम,गणेशपुरचे माजी सरपंच तथा महाजन तुकाजी आत्राम हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुलोचना आत्राम, शांताबाई किनाके, सावीत्राबाई मेश्राम, रेणुकाबाई मेश्राम, गंधारीबाई कोडापे, पारुबाई आत्राम, शोभाबाई कदम, ललीता तोडसाम, किशन मेश्राम, चंपत आत्राम (NGO) स्टाफ रुचीता फुलझेले , संगीता गायकवाड, राजेश पाटील यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मानंद यांनी केले, तर आभार गजानन कुडमेथे यांनी मानले.
No comments:
Post a Comment