रविवारपासून मुंबई - नांदेड - मुंबई विशेष रेल्वे धावणार... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 10 October 2020

रविवारपासून मुंबई - नांदेड - मुंबई विशेष रेल्वे धावणार...

 



परभणी, दि. 9 (प्रतिनिधी) ः मध्य रेल्वेद्वारे मुंबई (सीएसएमटी) - नांदेड - मुंबई ही स्पेशल रेल्वे रविवारपासून (दि.11) सुरू करण्यात येणार आहे. 


मुंबई येथुन रविवारी (दि. 11) सांयकाळी चार वाजून 35 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून ही विशेष रेल्वे निघणार आहे. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, लासलगाव, मनमाड, अंकई, नगरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू मार्गे परभणी रेल्वेस्थानकावर पहाटे तीन वाजून 15 मिनिटांनी पूर्णाहून नांदेड रेल्वेस्थानकावर पाच वाजून 30 मिनिटांनी पोचणार आहे.


सोमवारी (दि.12) सायंकाळी पाच वाजता नांदेड येथून ही एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना होणार आहे. पूर्णा येथे पाच वाजून 35 मिनीटांनी तर परभणी येथे सहा वाजून 10 मिनीटांनी, सेलू येथून सहा वजून 50 मिनिटांनी पोचणार आहे. पुढे औऔरंगाबाद येथे साडेनऊ वाजता, मनमाड येथे मध्यरात्री बारा वाजून 25 मिनीटांनी, नाशीकरोड येथे एक वाजून 25 मिनिटांनी, कल्याण येथे  सकाळी चार वाजून 16 मिनिटास, दादर येथे पाच वाजून सात मिनिटांनी व छत्रपती शिवाजी महाराज टर्निमस (मुंबई) येथे पाच वाजून 35 मिनिटांनी पोचणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages